मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सॅलियन आणि तिच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची काही दिवसापूर्वी मालवणी पोलिसांनी केली होती. नऊ तासांच्या चैाकशीनंतर त्यांना सोडण्यात आले होते. त्यांना १० मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आता या प्रकरणी नवीन खुलासा पोलिसांनी केला आहे.
''गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला त्यानंतर सोडण्यात आले,'' असे नारायण राणेंनी माध्यमांना सांगितले होते. पण राणे यांची केलेला दावा खोटा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
नारायण राणे आणि नितेश राणे यांचा अटकपूर्व फेटाळून लावण्यात यावा आणि त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, यासाठी पोलिसांनी न्यायालयासमोर २६ कारणं सांगितली आहेत. त्यात दिशा सालियन प्रकरणाबरोबरच त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यामागील कारणं पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली आहे. यात एक कारण नारायण राणे खोटं बोलल्याचंही आहे.
''आरोपींना ५ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आरोपी हजर राहिले, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही. आपल्याकडे असलेली माहिती आपण सीबीआयला देऊ अशी खोटी विधानं वारंवार केली. तसेच चौकशी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चौकशी दरम्यान फोन केला होता, असं धडधडीत खोटं विधान केलेलं आहे,'' असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (nitesh Rane) यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशा सॅलियन मृत्यूनंतर बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दिशाची आई वासंती सॅलियन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राणे पितापुत्रांची आठ तासांहून अधिक काळ पोलिसांनी चौकशी केल्याने तो चर्चेचा विषय झाला. केंद्रीय मंत्र्याला पोलिस ठाण्यात इतका वेळ बसवून ठेवण्याचा हा पहिलाच प्रकार असावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.