Health Department  Sarkarnama
मुंबई

Health Department: राज्यातील ८०० कंत्राटी परिचारिकांना सरकारचं मोठं गिफ्ट; आरोग्य सेवेत कायम करणार

State Government's Big Gift to Health Department : राज्यातील कंत्राटी परिचारिकांना मोठा दिलासा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील ८०० कंत्राटी परिचारिकांना (बंधपत्रित) आरोग्य सेवेत कायम करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कंत्राटी परिचारिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कंत्राटी परिचारिकांच्या संघटनांनी अनेक वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी लढा दिला. कंत्राटी परिचारिकांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. या कंत्राटी परिचारिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक आज पार पडली. यानंतर त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या परिचारिकांना शिक्षणानंतर शासन सेवा करणे बंधनकारक होते. आता सन २०१९ पर्यंत कार्यरत असलेल्या ८०० कंत्राटी परिचारिकांना (बंधपत्रित) शासकीय सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सन २०१९ पर्यंतच्या या परिचारिकांचा सेवा तपशील तपासण्यात येणार असून त्यानंतर शासकीय सेवेत कायम करण्यासाठी एका विशेष परीक्षेचेही आयोजन आरोग्य विभागामार्फत केले जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील कंत्राटी परिचारिका शासकीय सेवेत येणार आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT