Uddhav Thackeray & Neelam Gorhe News : ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर नीलम गोऱ्हेंची पहिली चिठ्ठी ; पण...

Maharashtra Politics : पीठासन अधिकारी नीलम गोऱ्हे यांनी मार्शलमार्फत एक चिठ्ठी उध्दव ठाकरेंकडे पाठवली.
Uddhav Thackeray & Neelam Gorhe News
Uddhav Thackeray & Neelam Gorhe News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : बेंगळूरू येथे विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी ( ता.१९) कामकाजात सहभागी होण्यासाठी सभागृहात उपस्थित राहिले. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. एकीकडे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याचवेळी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात दाखल झाल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच समोरासमोर आले. यावेळी विधान परिषदेच्या सभागृहात घडलेला प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे.

Uddhav Thackeray & Neelam Gorhe News
Uddhav Thackeray Meet Ajit Pawar : अजित पवारांची भेट का घेतली? उद्धव ठाकरे म्हणाले, "चुकीचा पायंडा.."

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी(दि.१९) विधिमंडळात दाखल झाले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात काहीवेळ बसल्यानंतर ते सभागृहात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे पीठासन अधिकारी होत्या. यावेळी पीठासन अधिकारी नीलम गोऱ्हे यांनी मार्शलमार्फत एक चिठ्ठी उध्दव ठाकरेंकडे पाठवली. मार्शलने ती चिठ्ठी ठाकरेंकडे दिली पण ती चिठ्ठी हातात घेत त्यांनी तशीच टेबलावर ठेऊन दिली. ती चिठ्ठी उघडूनही पाहिली नाही.

सुमारे पाऊण तास ठाकरे सभागृहात होते. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिलेली चिठ्ठीही टेबलावर पडली होती. शेवटी ठाकरे गोऱ्हे यांची चिठ्ठी उघडून पाहणार नाही असा अंदाज उपस्थितांनी बांधला. पण सभागृहातून बाहेर पडताना ती चिठ्ठीही बरोबर घेऊन गेले. गोऱ्हे यांनी त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहलं होतं? हे काही समजू शकले नाही. या प्रसंगाची विधान परिषदेच्या सभागृहात जोरदार चर्चा रंगली.

Uddhav Thackeray & Neelam Gorhe News
NCP Pimpri-Chinchwad : बालेकिल्ला राखण्याचं अजितदादांचं लक्ष्य; गव्हाणेंच्या दिमतीला तब्बल पाच कार्याध्यक्षांची 'टीम'

फडणवीस- ठाकरे आमनेसामने...

मागील काही दिवसांपासून राज्यात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. ठाकरेंकडून आधी फडतूस गृहमंत्री आणि काही दिवसांपूर्वी नागपूरला लागलेला कलंक असे शाब्दिक हल्ले फडणवीसांवर करण्यात आले होते.

मात्र, विधीमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे विधान परिषदेच्या सभागृहात असतानाच तिथे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले. त्यावेळी फडणवीसांनी ठाकरेंना नमस्कार केला. पण त्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. अखेर फडणवीस यांनी अनिल परब यांना हातवारे करुन उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले . त्यावेळी ठाकरे आणि फडणवीस यांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com