Mathadi Kamgar News : Sarkarnama
मुंबई

Mathadi Kamgar News : 'ती' विधेयके थांबवा, नाहीतर.. ; माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांचा राज्य सरकारला इशाला

Marathi News : माथाडी कायदा आला आणि या कष्टकरी जनतेचे आयुष्य बदलले.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : कामगार मंत्रालयाकडून विधानसभेत माथाडी सल्लागार समिती आणि माथाडी बोर्डाबाबत मांडण्यात येणाऱ्या विधेयकाविरोधात माथाडी कामगारांमधील रोष उघड झाला आहे. या विधेयकामुळे माथाडी कायदाच अस्तित्त्वात राहणार नाही, अशी भावना कामगारांमध्ये असल्याने कामगार आक्रमक झाले आहेत. ही विधेयके थांबवली नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

तसेच, सोमवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचं म्हटलं आहे. 1969 ला डोक्यावरून ओझी वाहणाऱ्या कामगारांना मालक चांगली वागणूक देत नसल्याने आणि योग्य मोबदला देत नसल्याने माथाडी कायदा आणला गेला. यानंतर या कष्टकरी जनतेचे आयुष्य बदलले. माथाडी कामगार सल्लागार समिती स्थापन करण्यात आली. त्या माध्यमातून माथाडी कामगारांचे विविध प्रश्न शासनापर्यत पोहचण्यासाठी काम करत आहे.

तसेच माथाडी बोर्डातही अनेक सदस्य आहेत. या संस्थांच्या माध्यमातून कामगारांच्या हिताची कामे केली जातात. आता मात्र कामगार मंत्रालयाच्या वतीने या दोन्हीही संस्था रद्द करण्यासाठी ही विधेयके आणली जात आहेत. असा आरोपच नरेंद्र पाटील यांनी केला आहे. या विधेयकामुळे माथाडी कायदाच रद्द होऊन कामगारांचे मोठे नुकसान होणार असल्याचही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

याबाबत आपण सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना भेटून माथाडीची भूमिका मांडणार आहे. अशा प्रकारे कोणातही कायदा करू नये अशी मागणी करणार आहे. हे थांबलं तर ठीक अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे पाटील यांनी इशारा दिला आहे. कॅबिनेट मंत्री दर्जा असणाऱ्या अण्णासाहेब पाटील मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीच सरकारला इशारा दिल्याने आता कामगार मंत्रालय काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT