Nitesh Rane Slams Sanjay Raut : राणेंचे राऊतांना सडेतोड उत्तर ; आनंद दिघेंच्या विरोधात राऊतांनी...

Maharashtra Politics : तेव्हा तुम्हाला मोदी हुकूमशहा वाटले नाहीत ?
Sanjay Raut Vs Nitesh Rane :
Sanjay Raut Vs Nitesh Rane :Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg : ‘आनंद दिघे यांचे नाव गद्दारांसोबत जोडू नका. हा दिघेंचा अपमान आहे,’ अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर रविवारी केली आहे. त्याला भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

"संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांना कशाप्रकारे त्रास दिला हे सर्व शिवसैनिकांना माहित आहे. दिघेंबाबत आज राऊत चांगले बोलत आहेत. याच राऊतांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब दिघेंचा कसा द्वेष करायचे हे जुन्या शिवसैनिकांना विचारा. ज्या दिवशी दिघे यांच्या मृत्यूची कथा लिहिली जाईल, तेव्हा उद्धव ठाकरेंचा रोल हा व्हिलनचा असेल," असा सूचक इशारा राणेंनी दिला.

Sanjay Raut Vs Nitesh Rane :
Ghosapuri Water Supply Scheme : 'घोसपुरी'चे पाणी पेटणार ; महाविकास आघाडी-भाजपमधील वाद चिघळणार !

२०१९ ला स्वतःच्या आमदारकीसाठी आणि मेहुण्याला वाचवण्यासाठी उद्धवजी कितीवेळा दिल्लीला गेले, किती वेळा मोदींसमोर झुकले. हे महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा तुम्हाला मोदी हुकूमशहा वाटले नाहीत ? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut Vs Nitesh Rane :
Sharad Pawar Visit PM Modi : शरद पवार हे मोदींसाठी पुण्यात थांबणार की केजरीवालांची विंनती मानणार ?

"दिघे हे एक निष्ठावंत शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर श्रद्धा असलेले शिवसैनिक होते.गद्दारांच्या तोंडी त्याचं नाव येणे म्हणजे त्या दिघेसाहेबांच्या निष्ठेचा अपमान आहे. त्यामुळे गद्दारांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असे राऊत म्हणाले आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावर राणे म्हणाले, "भिडे गुरुजींचे वक्तव्य मी ऐकलेलं नाही. भिडे गुरुजींचा आणि भाजपचा थेट काही संबंध नाही. निवडून येण्यासाठी काँग्रेसचे नेते भिडे गुरुजींसमोर नतमस्तक होतात. पृथ्वीराज चव्हाण यांचे तसे फोटो मी पाहिले आहेत. २०२४ ला निवडून येण्यासाठी आम्ही भिडे गुरुजींची मदत घेणार नाही, हे त्यांनी जाहीर करावं आणि मग त्यांच्यावर टीका करावी,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com