Rajbhavan Oth Ceremony: Sarkarnaa
मुंबई

Rajbhavan Oth Ceremony: राजभवनावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी ...

अजित पवार यांनी आज सकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली होती.

सरकारनामा ब्यूरो

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार आहेत. इतकेच नव्हे तर ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे ३० ते ४० आमदार आज भाजप- शिंदे सरकारमध्ये सामील होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

अजित पवार यांनी आज सकाळी बैठक बोलवली होती. त्यानंतर या बैठकीतील सर्व आमदार आज शपथ घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. राजभवनात नेते मंडळींची गर्दी जमली आहे. या शपथविधीच्या सोहळ्याची तयारी आज सकाळपासूनच सुरु असल्याचं बोलल जात आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील नेत्यांनी राजभवनात मोठी गर्दी जमली आहे. छगन भूजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, खासदार दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे, नरहरी झिरवळ यासंह राष्ट्रवादीचे अनेक नेतेमंडळीनी शपथविधीची तयारी केल्याचे दिसत आहे.

अजित पवार यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली होती. त्यासाठी १ जुलैपर्यंत त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. आज अचानक त्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षनेत्यांची बैठक बोलवली. या बैठकीला अनेक आमदारही उपस्थित होते. या बैठकीनंतर या सर्व नेत्यांचा ताफा राजभवनाकडे रवाना झाला आहे. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT