Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

Cabinet Expansion : दुसऱ्या टप्यात सात कॅबिनेट तर १७ राज्यमंत्र्यांचा विस्तार, मुनगंटीवार म्हणाले...

Sudhir Mungantiwar : २८८ आमदारांच्या १५ टक्केच मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्र्यांची संख्या ४३ एवढीच असेल," असे सुधीर मुनगंटीवार स्पष्ट केले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्यानंतर मंत्रीमंडळाचा (cabinet expansion) विस्तार झाला. पहिल्या टप्यात मंत्रीपद न मिळालेल्या नाराज इच्छुकांसाठी दिलासादायक बातमी आहे. दुसऱ्या टप्यात सात कॅबिनेट तर १७ राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहे. शिंदे गटातील नाराज नेत्यांपैकी कुणाला मंत्रीपदाची लॅाटरी लागणार हे दोन महिन्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर स्पष्ट होईल.

राज्याचे वनमंत्री , भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काल (बुधवारी) गणपतीच्या आगमनाला राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत खुलासा केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. काही खात्यांची आदलाबदली होण्याची दाट शक्यता आहे. यात शिंदे गटातील काही नेत्यांना कॅबीनेट मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यताही असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुनगंटीवार म्हणाले, "दुसऱ्या टप्प्यात सात कॅबिनेट तर 17 राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहेत. मंत्रीमंडळ विस्तार पुढच्या दोन महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे," शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २६ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्री असतील. दुसऱ्या टप्प्यात सात कॅबिनेट तर १७ राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहे.

"एकोणिस मंत्र्यांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये (दिवाळीपूर्वी) होईल. २८८ आमदारांच्या १५ टक्केच मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्र्यांची संख्या ४३ एवढीच असेल," असे सुधीर मुनगंटीवार स्पष्ट केले.

"येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून यावेत आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप युतीची सत्ता यावी यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. वरिष्ठ नेत्यांना राज्यभर दौरे करून लोकांमध्ये जाता यावे, या हेतूने सध्याचे खातेवाटप झाले आहे. त्यामुळे मंत्र्यांना दिलेली खाती पुन्हा बदलतील," असे वाटत नसल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT