Sanjay Raut, Sudhir Mungantiwar sarkarnama
मुंबई

राऊतांना अटक ही तर 'श्रींची' इच्छा; मुनगंटीवारांचा खोचक टोला

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली.

सरकारनामा ब्यूरो

चंद्रपूर : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. राऊत यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले आहे. राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, अशी खोटक टीका भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली.

मुनगंटीवार यांनी राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी कधीही वंचितांचे आणि बेरोजगारांचे-शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. राऊत हे अडीच वर्ष खलनायकी भूमिकेत होते. त्यांनी कधीही वंचितांचे प्रश्न मांडले नाही. त्याऐवजी आमदारांना रेडे म्हणत अपशब्द वापरले. 70 सेकंदात 70 शिव्या देण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राऊतांनी राज्याला बदनाम करण्यासाठी शेतकरी आंदोलनातील टीकैत यांचीही गळाभेट घेतली होती. सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत, असा भाव राऊत यांचा होता. कधी पत्रा चाळवासीयांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले. मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. ती देखील यांनी अडवली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. वकिलांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक ही तर श्रींची इच्छा, असे मुनगंटीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT