मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाकडून ( ईडी ) काल ( रविवारी ) कारवाई करण्यात आली. ईडीने संजय राऊत यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल केले आहेत. या संदर्भात भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somayya ) यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर जोरदार टीका केली. ( Where did Uddhav Thackeray-led Shiv Sena stay? )
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातून शिवसेना संपणार व केवळ भाजप राहणार असे विधान केले होते. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी सांगितले की, या बाबत महाराष्ट्राच्या जनते व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातही प्रश्न नाही. ते सध्या माझ्या सोबत कुठला आमदार, खासदार आहे हे शोधत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना राहिली कुठे? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकार महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
संजय राऊतांबाबत किरीट सोमय्या म्हणाले की, आधीच त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल आहे. त्यानुसार त्यांना अटक झाली. सोमवारपासून त्याची सुनावणी आहे. आणखी बरेच काही बाहेर येणार आहे. वसई-विरारमधील जमीन प्रकरणात संजय राऊत आहेत. संजय राऊत विदेशात जायचे. कोण त्यांना घेऊन जायचे. कशासाठी जायचे. तपास जसा जसा पुढे जाईल तसा माफिया नेत्याचे कारनामे बाहेर येतील, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, संजय राऊत, अनिल परब, अनिल देशमुख, नवाब मलिक, उद्धव ठाकरे, शरद पवार हे सर्व पुरावे खोटे असल्याची भाषा वापर होतो. किती दिवसांपासून अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत. अनिल पांडे कुठे गायब आहेत. हे माफीया घोटाळेबाजांना प्रत्येक घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत. सपना पाटकर दबून होती. आम्ही तिला संरक्षण दिले त्यामुळे तिने पुढे येऊन काल रात्री पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. अनिल परबांवरील करवाई तत्कालीन राज्य सरकारने थांबविली होती. त्यांच्या विरोधात सुरू झालेली फौजदारी कारवाई दाबण्यात आली. 17 ऑगस्टला पुन्हा दापोली न्यायालयात सुनावणी आहे. अनिल परबांवरही फौजदारी कारवाई सुरू होणार. त्यांचा रिसोर्टही तुटणार, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.