Sudhir Mungantiwar and Sanjay Raut Latest News
Sudhir Mungantiwar and Sanjay Raut Latest News Sarkarnama
मुंबई

`ईडीच्या धाकाने आमदार आमच्याकडे आलेले नाहीत...अन्यथा राऊतही आले असते!`

सरकारनामा ब्यूरो

Sudhir Mungantiwar : आज राज्याच्या विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत सरकारच्यावतीने भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना 164 मतं तर विरोधकांचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. यामुळे नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. ही निव़डणूक शिरगणती पद्धतीने पार पडली.

शिंदे सरकारने या निवडणुकीच्या निमित्ताने आपली पहिली लढाई जिंकली आहे. या विजयानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. महाविकास आघाडी सरकार हे जनतेची कमी आणि स्वत:ची जास्त काम करत होती. पैसे छपाईचा एक कारखाना नाशिकमध्ये तर दुसरा मंत्रालयात होता. मात्र, आता भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्याने पुन्हा महाराष्ट्र विकासाच्या दिशेने जाईल, अशी टीका भाजप (BJP) नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केला. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Sudhir Mungantiwar and Sanjay Raut Latest News)

मुनगंटीवार म्हणाले की, भाजप कायमचं जनतेच कामं करतो. महाविकास आघाडीकडून जनतेची कमी आणि स्वत:ची जास्त काम करण्यात आले. पैसे छपाईचा एक कारखाना नाशिकमध्ये आहे तर दुसरा मंत्रालयात होता. मात्र, आता भाजप-शिवसेना युतीचं सरकार पुन्हा राज्यात आल्याने महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेने जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ईडीची चौकशी सुरू असलेले बंडखोर आमदार आमच्यासोबत नाहीत असे स्पष्ट केले आणि जर तसे असते तर तर संजय राऊतही (Sanjay Raut) आमच्यासोबत आले असते, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

ते म्हणाले, यापूर्वी कॅाग्रेसने काय केले त्यांचा इतिहास तपासा आणि अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार असतांना मंत्रलयात दारूच्या बाटल्या सापडल्या असल्याचा आरोप करत जशी दृष्टी तशी सुष्टी दिसते, अश्या शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले.

दरम्यान, भाजप नेते आणि महाविकास आघाडील नेते एकमेकांवर टीका करण्याची कुठलीही संधी सोडतांना दिसत नाहीत. आज राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या भाषणांवर विधानसभेतील बाकडे वाजवून आनंद व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना उद्देशून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

ते म्हणाले की, कुणी काहीही म्हंटले तरी सत्तेत आलेल्या प्रत्येकाच्या मनात धाकधूक आहे. राज्यात जे काही घडले यावर आज भाजपच्या 105 आमदारांनी आपल्या विवेकबुद्धीला स्मरून विचारा की आपले समाधान झाले का? चंद्रकांतदादा बाकडे वाजवू नका. तुम्हाला मंत्रीपद देतील का नाही सांगता येत नाही. त्यामुळे कुठं बाकडं वाजवतायं. शिवसेनेतून गेलेले 39 आमदारांपैकी किती लोकांना मंत्रीपद मिळणार? सगळ्यांना वाटतयं मिळेल मिळेल. पण मलाही सांगता येत नाही काय होईल, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT