अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तासाभरातच सुनील प्रभूंचा नार्वेकरांना सूचक इशारा

Shivsena| Sunil Prabhu| देवेंद्रजींंना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं ते पाहून आम्ही आमचं दु:ख विसरुन त्यांच्याबद्दल दु:ख वाटलं.
Shivsena| Sunil Prabhu|
Shivsena| Sunil Prabhu|

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांच्या सरकारकडे 164 आमदारांचं बहुमत असल्याचे सिध्द झाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सरकारने 164 चा आकडा गाठला आणि राहुल नार्वेकरांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अभिनंदनपर भाषणात शिवसेनेचे (Shivsena) प्रतोद सुनील प्रभू यांनी शिंदे गटावर टीकेचा आसूड ओढला.

''ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली, आपण अध्यक्ष होत असताना या सदनात आमचा व्हिप झुगारुन ३९ सदस्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं. त्यांनी लोकशाहीची पायमल्ली केली हे इतिहास विसरणार नाही, याची खंत विधानसभेच्या आणि राज्यातील जनतेच्या मनात असेल. या लोकशाहीचा सन्मान म्हणून आपण सर्वोच्च पदावर बसलात, या अधिकाराचा वापर राज्यातील शेवटच्या माणसाला, आम्हाला न्याय देण्यासाठी होईल, असा विश्वास सुनील प्रभु यांनी व्यक्त केला. ज्या ३९ सदस्यांनी आमचा व्हिप मोडून मतदान केलं, त्यावरुन या विधानसभेचा कार्यकाळ असेल, त्या खुर्चीवर आपण किती काळ बसाल, याबद्दल आम्हाला शंका आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

Shivsena| Sunil Prabhu|
शिवसेना संकटात ; १६ आमदारांनी व्हिप डावलून मतदान केल्याची अध्यक्षांकडून नोंद

सुनील प्रभू म्हणाले, 'महाराष्ट्राची विधानसभा हे एक संसदीय मंदिर आहे. या मंदिराच्या सर्वोच्च स्थानावर आपण विराजमान झालात त्याचा आम्हाला अभिमान आहे. आपला राजकीय प्रवास पाहिला तर कधी काळी आपण आमच्या शिवसनेत होतात त्यानंतर राष्ट्रवादीत गेलात आणि आता भाजपमध्ये आहात. गेल्या १०-१५ दिवसांपूर्वी राज्यात सत्तांतराचे वारे वाहू वागले. त्यावेळी आम्हाला असं वाटलं राहुल नार्वेकर कदाचित कायदा मंत्री होतील, पण दुर्दैवाने नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात, नियती कधीही कुणावरही आघात करु शकते. या राज्यात असंही घडू शकतं की, आम्ही ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिलं आहे त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. ज्यांना आम्ही कायदामंत्री म्हणून बघत होतो त्यांना विधानसभेचा अध्यक्ष म्हणून पाहत आहोत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांना दूर व्हाव लागलं. ज्या विधानसभेत ज्यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळली ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वाटलं त्या देवेंद्रजींंना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, ते पाहून आम्ही आमचं दु:ख विसरुन त्यांच्याबद्दल दु:ख वाटलं. विधीमंडळाच्या सर्वोच्च स्थानी बसल्यानंतर आपल्याला जो मान सन्मान आहे, अधिकार आहे त्याचा वापर तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षाला न्याय मिळवून देण्यासाठी कराल अशी अपेक्षा सुनील प्रभू यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com