Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar News Sarkarnama
मुंबई

राज्यपालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका? मुनगंटीवारांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो

Sudhir Mungantiwar News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नियमीत अडचणीत येतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केल्याल्या विधानावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक होत, भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही, त्यांच्या वक्तव्याशी राज्यकर्ते सहमत आहेत का, असा सवाल केला होता. त्यावर राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, राज्यपालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या विधानाचा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही. राज्यपालांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अपार आधार आहे. माझ्या त्या भाषणाचे कोणी चुकीचे अर्थ काढू नये. एवढे स्पष्ट राज्यपाल बोलल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यावर चर्चा प्रतिक्रिया योग्य नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे. जोवर सूर्य, चंद्र आहे पृथ्वी आहे तोवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी राज्यापालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्या विरोधात ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले, "भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच"! असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यापाल काय म्हणाले होते?

''तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत, असे विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT