Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

Mungantiwar Upset In BJP : भाजपची मुंबईत बैठक असताना मुनगंटीवार विमान पकडून चंद्रपूरला पोचले; अनुपस्थितीचे कारण आले पुढे...

BJP News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ‘वन टू वन’ चर्चा करत आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai News : मी भारतीय जनता पक्षात नाराज असण्याचा प्रश्न या जन्मात तरी शक्य नाही. मला पक्षाने एवढा सन्मान दिला आहे. त्यामुळे यापुढे मी कोणत्याही पदावर राहिलो नाही तरी मला कोणतंही दुःख होणार नाही. पण हे खरं आहे की, मला भाजपच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, त्यामुळे चंद्रपूरला आलो, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. (Mungantiwar took a plane and went to Chandrapur during BJP meeting in Mumbai)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ‘वन टू वन’ चर्चा करत आहेत. या बैठकीला राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मात्र गैरहजेरी आहे. ते चंद्रपूरला निघून गेले आहेत. मुंबईत बैठकांना सुरुवात होत असताना मुनगंटीवार हे नागपूरसाठी विमान पकडून निघाले होते. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुनगंटीवार हे भाजपमध्ये नाराज आहेत का, अशी चर्चा रंगली आहे.

भाजप बैठकीच्या अनुपस्थितीबद्दल मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी नाराज असण्याचा प्रश्न या जन्मात तरी शक्य नाही. कारण, मला भारतीय जनता पक्षाने तेवढा सन्मान दिलेला आहे. यापुढे कोणत्याही पदावर राहिलो नाही, तरी मला कोणतंही दुःख होणार नाही. पण हे खरं आहे की, भाजपच्या बैठकीचं निमंत्रण मला पोचलं नव्हतं. त्याला काही कारणंही असू शकतात.

पूर्वी दूरध्वनीवरून निमंत्रण दिलं जायचं. आता व्हॉट्‌स ॲपवरून निमंत्रण दिलं जातं. पण, मी कधी कधी दोन-दोन दिवस व्हॉट्‌स ॲप बघत नाही. त्यातून निमंत्रण मिस होण्याची शक्यता आहे. मी माझ्या ऑफिसला सूचना केली आहे की, मुंबईत बैठक आहे आणि त्या बैठकीला मंत्री हजर असणे अपेक्षित आहे. मला माहिती का पोचली नाही, याची चौकशी करावी.पक्षाकडून एखाद्या ‘पीए’ला माहिती देण्यात आली आणि त्यांनी मला ती माहिती दिली नाही, हेही तपासून पाहावे लागणार आहे. तसे झाले असेल तर गंभीर आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

मी माझं व्हॉट्‌स ॲप तपासलं. माझ्या व्हॉट्‌स ॲपवर मला निमंत्रण आलेलं नव्हतं. कोणतीही एसएमएस नाही. माझा दौरा पाहणारा अगोदरचा जो माणूस होता, तो आता दुसऱ्या जागेवर नियुक्त झाला आहे. त्यामुळे कदाचित कम्युनिकेशन गॅप तयार झाला का, हेही पाहावे लागणार आहे. पण, एक गोष्ट सांगतो की पक्षावर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. जरी नाराज झालो, तरी अशा छोट्या गोष्टींतून नाराजी व्यक्त करणारा कार्यकर्ता मी कसा असू शकतो, असा सवालही मुनगंटीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT