Solapur News : धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वय शेखर बंगाळे यांनी खिशातून काय काढले, हे मला समजले नाही. त्या झटापटीत माझ्याकडून अनावधनाने काही गोष्टी झाल्या. त्याबद्दल धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी समस्त धनगर समाजाची माफी मागतो. धनगर समाजातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी या गोष्टीचं भांडवल करू नये. झालेल्या चुकीबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माफी मागितली. (Solapur city president of BJP asked for apology from Dhangar community)
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी शेखर बंगाळे व इतर लोक आले होते. निवेदन दिल्यानंतर बंगाळे यांनी पालकमंत्र्यांवर भंडारा उधळला होता. त्यानंतर विखे पाटील यांचे सुरक्षा रक्षक आणि नरेंद्र काळे यांनी बंगाळे यांना मारहाण केली होती. त्याची तीव्र प्रतिक्रिया धनगर समाजातून उमटली, त्यामुळे काळे यांनी तातडीने माफी मागितली.
नरेंद्र काळे म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन देण्यासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे हे आले होते. त्या वेळी त्यांना पोलिस आतमध्ये भेटीसाठी सोडत नव्हते. त्यावेळी मी जबाबदारी घेऊन पोलिसांना विनंती करून बंगाळे यांना पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी सोडले होते. कुठलेही गैरकृत न करण्याची शाश्वती त्यांनी मला दिली होती. तसेच, मी फक्त निवेदन देऊन जाणार आहे, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांची जबाबदारी घेऊन मी पालकमंत्र्यांकडे घेऊन गेलो होतो.
शेखर बंगाळे यांनी खिशातून काय काढले, हे समजले नाही. त्या झटापटीत माझ्याकडून अनावधनाने काही गोष्टी झाल्या. त्याबद्दल धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी समस्त धनगर समाजाची माफी मागतो. मी जसा भारतीय जनता पक्षाचा सोलापूर शहराध्यक्ष आहे, तसाच सर्वात आधी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे. समाजाच्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, धनगर समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या गोष्टीचं भांडवल करू नये. झालेल्या चुकीबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. समाजापुढे दहा वेळा माफी मागायला माझ्यापुढे कोणताही किंतु, परंतु नसेल. यापुढे अशा गोष्टी होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.