Sujit Patkar ED Custody Sarkarnama
मुंबई

ED Inquiry In BMC Covid Scam : कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांच्या ईडी कोठडीत वाढ

Sujit Patkar ED Custody: सुजीत पाटकरांच्या कोठडीत वाढ केल्यानंतर न्यायालयाने ईडीला काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर आणि डॉ.किशोर बिचुले यांना गेल्या आठवड्यात ईडीने अटक केली होती. यानंतर शुक्रवारी पाटकर आणि बिचुले यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सुजित पाटकर यांना 1 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. तर बिचुले यांना १० ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुजीत पाटकर यांच्यावर 100 कोटींच्या भष्ट्राचाराचा आरोप केला होता. या प्रकरणाची ईडीने गंभीर दखल घेऊन सुजीत पाटकरांना अटक केली होती. पाटकरांच्या पाठोपाठ शिवसेनेचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचीही ईडीने चौकशी केली.

कोरोना काळात एका कंपनीने वैद्यकीय साहित्य खरेदीत 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप असून ही कंपनी सुजीत पाटकर यांची असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. वैद्यकीय साहित्य वाढीव दरात खरेदी करण्यात आल्याचाही आरोप आहे.

सुजीत पाटकरांच्या कोठडीत वाढ केल्यानंतर न्यायालयाने ईडीला काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. पाटकरांची चौकशी करतांना त्यांचा वकील सोबत असावा, रात्री चौकशी करू नये, तसेच आवश्यक असेल ती औषधे पाटकरांना देण्यात यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT