Narhari Zirwal News: नरहरी झिरवळांनी आदिवासी आमदारांसह का घेतली राज्यपालांची भेट? स्वत:च सांगितलं कारण..

Political News: आमदार नरहरी झिरवळ यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
Narhari Zirwal News
Narhari Zirwal NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. ऐन अधिवेशनात तेही सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्ष वाढत असतानाच झिरवळ राजभवनाकडे गेल्याने काही काळ गोंधळ उडाला, चर्चाही झाल्या. पण आदिवासी विकास सोसायटीच्या प्रश्नावरुन आणि मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी आपण राज्यपालांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण झिरवळांनी दिले.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर झिरवळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "आदिवासी विकास सोसायटीचा प्रश्न आदिवासी समाजासाठी महत्वाचा विषय आहे. तो मार्गी लावण्यासाठी आणि मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी आपण राज्यपाल बैस यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली, यावेळी आदिवासी आमदारही आपल्याबरोबर उपस्थित होते", असे ते म्हणाले.

Narhari Zirwal News
Ahmednagar Politics : रोहित पवारांचे उपोषण, तर राम शिंदेचा आग्रह; अखेर कर्जत MIDC च्या जीआरची सामंतांची घोषणाच!

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून यातच शिवसेनेच्या आमदारांचा अपात्रतेचा मुद्दाही चर्चेत आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्रतेच्या प्रश्नासंदर्भात झिरवळांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता ऐन अधिवेशनाच्या काळातच झिरवळांनी राज्यपालांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Narhari Zirwal News
Narendra Modi On Congress : मोदींची भविष्यवाणी, काँग्रेसचा अविश्वासाचा ठराव अन् 'तो' व्हिडिओ व्हायरल...

नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून राज्यातील राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. त्यांचा मतदारसंघ आदिवासी बहुल भागातील असल्याने ते आदिवासी समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडत असतात. आताही त्यांनी आदिवासी विकास सोसायटीचा प्रश्नांसंदर्भात राज्यपालांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चांवर पडदा पडला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com