Sunetra Pawar Oath as DCM 
मुंबई

DCM Sunetra Pawar: सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; लोकभवनात साध्या पद्धतीनं पार पडला शपथविधी

Sunetra Pawar Oath Ceremoney: सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील लोकभवनात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी अजित पवार अमर रहे या घोषणांनी आमदारांनी सभागृह दणाणून सोडलं.

Amit Ujagare

DCM Sunetra Pawar Oath Ceremoney: 'मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्व प्रतिज्ञा करते की....मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून सर्व कामे निष्ठापूर्वक पार पाडेन...' अशा शब्दांत सुनेत्रा अजित पवार यांनी लोकभवन इथं शनिवारी (३१ जानेवारी) महाराष्ट्राच्या १७ व्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार अमर रहे...

डायसवर जाऊन राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यानंतर उपस्थित आमदारांनी 'अजित पवार अमर रहे', 'एकच वादा अजित दादा' आणि 'अजित पवार अमर रहे' अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. अगदीच पाचच मिनिटांत हा शपथविधीचा सोहळा संपन्न झाला.

बारामतीकडं रवाना होणार

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या तातडीनं पुन्हा बारामतीकडं रवाना होणार आहेत. अजित पवार यांचा दशक्रिया विधी पार पडेपर्यंत त्या बारामतीतच राहणार आहेत. यानंतर त्या मुंबईत परततील अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

अजित पवारांचं अपघाती निधन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात नुकतंच निधन झालं. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळं अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. अजितदादांचं निधनानंतरचा आज चौथा दिवस आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारनं एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी आणि नंतर तीन दिवस राज्यदुखवटा जाहीर केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT