Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची लगबग... पण शिवसेना आमदारांच्या मनात वेगळचं काहीतरी; भाजप-राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी

Sunetra Pawar: शिवसेनेच्या आमदारांना ही गोष्ट पटत नसल्याचं दिसतंय, कारण या शपथविधीबाबत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
 Sunetra Pawar, New Deputy Chief Minister of Maharashtra:
Sunetra Pawar, New Deputy Chief Minister of Maharashtra:Sarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या काहीवेळातच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण दुसरीकडं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचं काहीतरी वेगळचं सुरु आहे. या आमदारांना ही गोष्ट पटत नसल्याचं दिसतंय. कारण या शपथविधीबाबत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

 Sunetra Pawar, New Deputy Chief Minister of Maharashtra:
First Budget of India : भारताचं पहिलं बजेट कोणी अन् कधी सादर केलं?

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राजकारणात, सार्वजनिक जीवनात खुर्ची जिंकली माणूस हरला, अशा शब्दांत शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या शपथविधीच्या ज्या काही घडामोडी घडत आहेत या निश्चित काही कालावधी गेल्यानंतर होणं साहजिक होतं. परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे धक्कादायक आहे. काल राख सावडण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुनेत्रा वहिनी मुंबईकडे जाणे इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे हे थोडंसं मनाला पटत नाही. परंतू हे राजकारण आहे, त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे. तो का घेतला, कोणत्या परिस्थितीत आणि का घ्यावा लागला? हे सगळ जरी प्रश्नचिन्ह निर्माण करणारं असलं तरी अखेर हा निर्णय झालेला आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

 Sunetra Pawar, New Deputy Chief Minister of Maharashtra:
Rohit Pawar News: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी जोरदार हालचाली; रोहित पवारांचं सूचक ट्विट, काय म्हणाले...?

तर दुसरीकडं शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं की, अजितदादांची राखही अद्याप शांत झाली नाही, मात्र इतक्या लवकर या घडामोडी होतील असं वाटलं नाही. हा पवार कुटुंबियांचा एकत्रित निर्णय असेल, गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर दादांचीही मानसिकता हीच होती की, दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावे. दोन्ही कुटुंबांनी मिळून हा निर्णय घ्यायचा आहे. त्यांच्या मागे भीष्मपितामह म्हणून शरद पवार साहेब उभे आहेत. त्याचबरोबर अजित पवारांच्या निधनामागे कुठलाही घातपात दिसत नाही तर हा केवळ अपघात आहे, असंही संजय गायकवाड यांनी पुढे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com