Rohit Pawar Ajit Pawar .jpg Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar News: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी जोरदार हालचाली; रोहित पवारांचं सूचक ट्विट, काय म्हणाले...?

Ajit Pawar NCP : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात अकाली निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊन दोन दिवस झाले आहेत.त्याचवेळी अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव पास जवळपास निश्चित मानलं जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात अकाली निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊन दोन दिवस झाले आहेत.त्याचवेळी अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव पास जवळपास निश्चित मानलं जात आहे.

मुंबईत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत एकमतानं गटनेतेपदी निवड झाली आहे. याच सगळ्या घडामोडींना प्रचंड वेग आला असतानाच आता दुसरीकडे कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सूचक ट्विट केलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता.31) सकाळी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या निधनानंतर महत्त्वाच्या मु्द्द्यांवर भाष्य केलं होतं.त्यातच त्यांनी मोठा खुलासा करतानाच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं म्हटलं होतं. तसेच या संदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं होतं. याचदरम्यान, शरद पवार यांच्या या विधानानंतर आता आमदार रोहित पवार यांनी केलेलं ट्विटवरुन तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. त्यांनी या ट्विटमधून नेमका काय संदेश द्यायचा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतात, बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि अजितदादा…! आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर #उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा #भावी_मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या ट्विटमध्ये मोठे राजकीय संकेत असल्याचं मानलं जात आहे.

तसेच डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे… ना आनंदाचा जल्लोष…! गळ्यात हार घातलेला अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीये, असं सांगतानाच आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळं अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये.!, असं आवाहन रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पार्थ पवार - शरद पवार भेट

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पत्रकार परिषदेत आपल्याला सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेबाबत माहिती नसल्याचं म्हटल्यानं मोठी खळबळ उडाली होती. यानंतर थोड्याच वेळात पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

तब्बल तासभर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही माहिती समोर येत आहे. त्यानंतर पार्थ यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावेळी सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर पार्थ हे गोविंदबागेतून बाहेर पडले. यानंतर सुनेत्रा पवार विधानभवनात आमदारांच्या बैठकीसाठी दाखल झाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT