Shivsena setback in Kokan : कोकणात शिंदेंना मोठा धक्का? शिवसेना आमदाराकडून भाजला छुपी मदत, माजी जिल्हाप्रमुखाच्या गौप्यस्फोटाने राजकीय भूकंप

Shivsena MLA Mahendra Thorve Join BJP : राज्यात अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चेनं राजकीय वर्तुळ तापले असतानाच आता शिंदेंना कोकणात धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा अतुल भगत यांनी केला आहे.

  2. थोरवेंनी छुप्या पद्धतीने भाजप उमेदवारांना मदत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  3. या आरोपांमुळे कोकणातील शिवसेनेत मोठी खळबळ उडाली असून थोरवेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Raigad News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांना कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केला असून गद्दारी करणाऱ्या थोरवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना भगत यांनी थोरवेंनी उरण, पनवेल, कर्जत-खालापूर परिसरात भाजपचे आमदार महेश बालदी यांना छुप्या पद्धतीने मदत केली. त्यांच्या या कृत्यामुळेच शिवसेना रसातळाला गेल्याचेही म्हटले आहे. भगत यांच्या या आरोपामुळे आता कोकणातील शिवसेनेत खळबळ उडाली असून थोरवे काय म्हणतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या घटनेता तीन एक दिवस होत असून खासदार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आज (ता. 31) त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असेही बोलले जात आहे. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या चर्चेनं राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं असतानाच कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केला आहे.

अतुल भगत यांनी, आमदार महेंद्र थोरवे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांसाठी उरण, पनवेल, कर्जत-खालापूर मतदारसंघात मदत केली. त्यांनी शिवसेना संपवण्यासाठी जीवाचा आटा-पिटा केला. आपल्या पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रभारी जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांना आदेश दिले. पण हे आदेश त्यांनी भाजपचे महेश बालदी यांच्या सांगण्यावरून दिले. त्यांच्या आदेशानंतरच साबळे यांनी उरण-पनवेल मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सांगितले.

Eknath Shinde
Shivsena Vs BJP : शिवसेनेचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंना धक्का; ऐन निवडणुकीत मुख्य शिलेदाराने साथ सोडली

त्याच्या या आदेशानंतर उरण-पनवेल मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांनी बंड केले असून सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार देऊन आदेश धुडकावून लावले आहेत. या बंडखोरीनंतर आता त्यांच्यावर कारवाईची भाषा केली जात आहे. यामुळे अशी भाषा करणाऱ्यांचे खरा चेहरा जनतेसमोर आणल्याचेही अतुल भगत यांनी दावा केला आहे.

तसेच अतुल भगत यांनी आमदार थोरवे यांच्यावर आरोप करताना, थोरवे यांनी उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपविरोधात लढणाऱ्या उमेदवारांना देण्यात आलेले एबी फॉर्म परस्पर गहाळ केले. त्याच्या पक्षविरोधी कारवाईनंतर ठाण्याच्या कार्यालयातून एबी फॉर्म आणत ते उमेदवारांना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मागील साडेतीन वर्षांपासूनच उरण, पनवेल, कर्जत-खालापूर मतदारसंघात आमदार थोरवे यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेत भाजपला सहकार्य केले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. उलट महेश बालदी यांना सहकार्याची भावना ठेवत अनेकांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा केल्याचा आरोप देखील केला आहे. तर खासदार बारणे यांनी उरण, पनवेल, कर्जत-खालापूर मतदारसंघातील पक्षाच्या कारभारात ढवळाढवळ करू नये अशी तंबीच थोरवे यांना दिल्याचा दावा देखील अतुल भगत यांनी केला आहे.

Eknath Shinde
Shivsena UBT : 'मोदी-फडणवीसांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ थोतांड, खोटारडेपणा..., बदनामीबद्दल ते दादांच्या कुटुंबीयांची माफी मागणार का?'

FAQs :

Q1. महेंद्र थोरवे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का?
👉 अतुल भगत यांनी तसा दावा केला आहे, मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Q2. अतुल भगत यांनी नेमके काय आरोप केले आहेत?
👉 थोरवेंनी भाजप उमेदवारांना छुप्या पद्धतीने मदत केली असा आरोप केला आहे.

Q3. या प्रकरणाचा एकनाथ शिंदेंवर काय परिणाम होऊ शकतो?
👉 कोकणात शिवसेनेची संघटनात्मक अडचण वाढण्याची शक्यता आहे.

Q4. महेंद्र थोरवे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे का?
👉 सध्या थोरवेंची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Q5. या प्रकरणामुळे कोकणातील राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 शिवसेनेत अंतर्गत वाद वाढून राजकीय समीकरणे बदलू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com