Sunetra Pawar taking oath as Maharashtra Deputy Chief Minister amid political controversy following Ajit Pawar’s death. Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : रामदास कदमांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून केलेल्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले 'स्वत:चं राजकारण...'

Sunetra Pawar Oath Maharashtra Politics : सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवरून सध्या राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही नेत्यांनी अजित पवारांचे सर्व अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर शपथ घ्यायला पाहिजे होती, असं मत व्यक्त केलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 06 Feb : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, अजित पवारांच्या निधनाच्या चौथ्या दिवशीच त्यांनी घाईघाईत शपथ घेतल्याची टीका केली जात आहे.

या शपथविधीवरून सध्या राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही नेत्यांनी अजित पवारांचे सर्व अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर शपथ घ्यायला पाहिजे होती, असं मत व्यक्त केलं आहे. अशातच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला.

"अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुनील तटकरेंनी अतिशय गलिच्छ राजकारण केलं. शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलं.", अशा शब्दात रामदास कदम यांनी तटकरेंवर टीका केली.

तर रामदास कदमांच्या याच वक्तव्या संदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत होत असलेला वाद अतिशय निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.

फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत जो काही वाद होतोय, तो अतिशय निरर्थक आणि चुकीच्या प्रकारचा वाद-विवाद होत आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:चं राजकारण यात कसं करता येईल, हाच प्रयत्न करत आहे. राज्यातील मोठे नेते अजित पवार हे आपल्यातून निघून गेलेत आणि त्यानंतर अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण बंद झालं पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT