Sharad Pawar, Sanjay Raut
Sharad Pawar, Sanjay RautSarkarnama

Rajya Sabha election 2026 : शरद पवार राज्यसभा लढवणार? संजय राऊत म्हणाले 'त्यांची मानसिकता थांबण्याची, पण कुणासमोर हात पसरायची...'

Sanjay Raut on Sharad Pawar Rajya Sabha election : सध्याचे संख्याबळ पाहता ७ जागांपैकी ६ जागा महायुतीला तर १ जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलं तरी महायुतीला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
Published on

Mumbai News, 06 Feb : ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार हे येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. त्यांच्यासह महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे.

त्यामुळे शरद पवार आता पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार की ते राजकारणातून निवृत्ती घेणार? याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे २०२४ च्या राज्यातील निवडणुकीनंतर विधानसभेत महायुतीची ताकद वाढल्याने महाविकास आघाडीच्या ३ जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या आहेत.

सध्याचे संख्याबळ पाहता ७ जागांपैकी ६ जागा महायुतीला तर १ जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलं तरी महायुतीला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Sharad Pawar, Sanjay Raut
Nashik Mayor Election : नाशिक महापालिकेत मोठा ट्विस्ट ! भाजप-शिंदे शिवसेना शेवटच्या क्षणाला एकत्र, उपमहापौरपद शिवसेनेला

शरद पवारंनी जर राज्यसभेची निवडणूक लढवायचं ठरवलं तर त्यांना निवडून आणण्या एवढी मतं महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे शरद पवारांना कोणासमोर हात पसरायची गरज नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. शिवाय शरद पवारांची मानसिकता आता थांबण्याची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar, Sanjay Raut
RBI new regulations : बँक खातेदारांसाठी महत्वाची बातमी; खात्यातून पैशांची चोरी झाल्यास मिळणार मोठी भरपाई, RBI ची घोषणा

संजय राऊत म्हणाले, शद पवार साहेबांची मानसिकता आता थांबायला पाहिजे अशी आहे. मात्र, आम्ही त्यांना सांगितलं की, तुमच्या सारख्या नेत्याने दिल्लीत असणं म्हणजे दिल्लीत महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणं होयं, हे सांगताना माझ्यासोबत उद्धव ठाकरे देखील होते, असंही राऊतांनी सांगितलं. त्यामुळे आता आगामी राज्यसभेची निवडणूक शरद पवार लढवणार की राजकारणातून निवृत्ती घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com