Mumbai News, 16 Jul : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी भेट घेतली होती. मात्र, या भेटीची पूर्वकल्पना पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना नसल्याची माहिती समोर येत आहे.
पटेल आणि तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले होते. पण या भेटीची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना कल्पना देखील नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवगिरीवरील अंतर्गत बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी या गुप्त भेटीबाबत तटकरेंना थेट जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तीन बड्या नेत्यांचा समावेश होता.
या भेटीची माहिती समोर येताच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मात्र, या भेटीबाबत आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची जी भेट घेतली. या भेटीची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना कल्पनाच नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी या गुप्त भेटीबाबत तटकरेना थेट जाब विचारला, त्यावर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत ही भेट घेतल्याचा खुलासा तटकरींनी केला.
साम टीव्हीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुनील तटकरेंना सुनेत्रा पवार यांनी तुम्ही नेमकी कशासाठी भेट घेतली? असा प्रश्न विचारला. त्यावर तटकरे यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक येणार त्या संदर्भामध्ये भेट घेतल्याचं आणि चर्चा केल्याचं सांगितलं.
पण ही भेट घेण्याआधी त्यांनी याबाबतची पूर्वकल्पना देण्याची गरज होती. मात्र ती न दिल्याने सुनेत्रा पवार प्रचंड नाराज असल्याचं समजतं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी काही घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.