Sunetra Pawar and Rupali Chakankar amid rising political controversy over an alleged threat complaint, drawing attention across Maharashtra politics. Sarkarnama
मुंबई

Rupali Chakankar Controversy : चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

Devendra Fadnavis on Rupali Chakankar Controversy : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याची तक्रार अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 12 Apr : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

या तक्रारीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर ही तक्रार बीडमधील एका व्यक्तीने दाखल केल्याची माहिती असून या व्यक्तीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचा दावा केला आहे.

तर तक्रारी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "राज्याच्या मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आम्ही यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल. आपल्या पोलीस खात्याने या यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे.

त्यामुळे जरूर अशा प्रकाराचं पत्र असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि योग्य सुरक्षा तर आहेच", असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, अशोक खरात प्रकणामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणी चांगल्याचं वाढल्या आहेत. आधीच त्यांना आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागला आहे.

तर दुसरीकडे त्यांच्या बहिणीचं नाव देखील खरात प्रकणात आलं आहे. तर आता चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, या तक्रारी मुळे चाकणकर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र, या तक्रारीत किती तथ्य आहे हे मात्र तपासातूनच समोर येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT