US-Iran Talks Fail : अखेर ज्याची भीती तेच घडलं! पाकिस्तानातील शांतता चर्चा निष्फळ; अमेरिकेला जाता जाता जे.डी वान्स म्हणाले, "इराणसाठी वाईट बातमी..."

Islamabad Peace Talks Collapse : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठीची शांतता चर्चा सुरू होती. मात्र, तब्बल 21 तास सुरू असलेल्या या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
US-Iran Talks Fail | Islamabad Peace Talks Collapse
US and Iran delegations during high-stakes peace talks in Islamabad, discussing war resolution and nuclear deal issues.Sarkarnama
Published on
Updated on

Islamabad Peace Talks Collapse : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठीची शांतता चर्चा सुरू होती. या चर्चेतून नेमका काय तोडगा निघणार याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या.

मात्र, जगातील सर्वात महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चांपैकी एक असलेली ही बैठक युद्धावर कोणताही तोडगा न निघताच संपुष्टात आली आहे. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात तब्बल 21 तास चर्चा सुरू होती. मात्र, आता ही चर्चा फिस्कटल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी जाहीर केलं आहे.

या बैठकीनंतर जे.डी. व्हान्स यांनी म्हणाले की, "या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. आम्ही येथे प्रामाणिक हेतूने आलो होतो. मात्र, इराण कराराच्या अटी स्वीकारण्यास तयार नाही. चर्चा फिस्कटल्यामुळे आम्ही अमेरिकेला परत जात आहोत. आमच्यात कोणताही करार होऊ शकला नाही.

US-Iran Talks Fail | Islamabad Peace Talks Collapse
CJI Surya Kant : भारतीय न्यायव्यवस्था कात टाकणार! CJI सूर्यकांत यांनी मांडली वेगवान न्यायाची महत्वाकांक्षी योजना; आता कोर्टाशिवाय...

ही अमेरिकेसाठी ही जितकी वाईट बातमी आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक ती इराणसाठी वाईट बातमी आहे. या बाबातची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देऊ", असं व्हान्स म्हणाले. तर दुसरीकडे अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी अमेरिकेने अतिरेकी आणि बेकायदेशीर मागण्या केल्याचा आरोप केला.

US-Iran Talks Fail | Islamabad Peace Talks Collapse
Marriage Card : राजस्थानमध्ये लग्नपत्रिकांच्या फॉर्मेटमध्ये मोठा बदल : थेट सरकारचाच हस्तक्षेप; महाराष्ट्रही अंमलबजावणी होणार?

ते म्हणाले, "ही चर्चा अत्यंत सखोल होती. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. या चर्चांचे यश हे दुसऱ्या बाजूने दर्शवल्या जाणाऱ्या प्रामाणिकपणाच्या आणि समतोलाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. गेल्या 24 तासांत 'हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि अणुकार्यक्रमावरील निर्बंध उठवणे, युद्धाची नुकसानभरपाई आणि संपूर्ण प्रदेशातील संघर्ष संपुष्टात आणणे यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

मात्र, याबाबतीत अमेरिकेने अतिरेकी आणि बेकायदेशीर मागण्या केल्या, असा दावा बकाई यांनी केला आहे. दरम्यान, या बैठकीनंतर व्हान्स यांनी पाकिस्तानचे गोडवे गायले आहेत. इराणने आमच्या अटी स्वीकारणे नाकारल्या या वाटाघाटींमध्ये काही उणिवा राहिल्या असतील तर त्या पाकिस्तानच्या प्रतिनिधींमुळे नव्हत्या. कारण पाकिस्तानने अत्यंत उत्कृष्ट काम केले दोन्ही देशांमध्ये एखादा करार घडवून आणण्यासाठी त्यांनी आम्हाला मनापासून मदत करण्याचा प्रयत्न केला, असं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com