<div class="paragraphs"><p><strong>Sunil Prabhu</strong></p></div>

Sunil Prabhu

 
मुंबई

नितेश राणेंचे म्याव म्याव, सुनिल प्रभुंचे थेट विधानसभा उध्यक्षांना पत्र

सरकरनामा ब्युरो

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधिमंडळात प्रवेश करताना म्याव म्याव करून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभुमीवर अशा प्रकारची विडंबनात्मक कृती विधिमंडळाच्या आवारात सभागृहात होऊ नये, विधीमंडळाची पवित्रता‌ राखली गेली पाहिजे, यासाठी विधीमंडळात नक्कल अंगविपेक्ष करणाऱ्याविरोधात कायदा करावा, अशी मागणी मुख्य प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्राद्वारे केली आहे.

वाचा, काय लिहीले आहे, सुनील प्रभुंनी आपल्या पत्रात

राज्य विधीमंडळाच्या महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय या विधान भवन इमारत विधानसभा व विधानपरिषद ही दोन्ही भारतीय संविधानाची सार्वभौम सभागृह आहेत. या सभागृहातून जनतेला न्याय मिळावा याकरीता कामकाज होत असते. या विधान भवन इमारतीतील लोकशाहीचे मंदीर असलेल्या व संविधानानुसार त्याला असलेले एक आगळे-वेगळे महत्व व पावित्र्य आहे.

विधीमंडळात सदस्य म्हणून निवडूण येणारे लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून प्रगल्भ लोकशाही पध्दतीने वि.प.स. आणि वि.स.स. यांच्याकरीता असलेल्या नियमावलीचे पालव आणि जोपासून करुन विधीमंडळात कामकाज करीत असतात. ही इमारत म्हणजे लोकशाहीला संविधानाने दिलेले कायदेमंडळ आहे. याचा आदर करणे आणि पावित्र्य राखणे हे प्रत्येक सदस्यांचे व या इमारतीत वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तिंचे कर्तव्य आहे.

या पवित्र्य इमारतीच्या परिसरात कोणतेही मंत्री, जेष्ठ नेते किंवा सन्मानीय सदस्य यांचा अंगविक्षेप करुन किंवा नकला व हावभाव करून किंवा आवाज काढून मान्यवरांना अपमानित करणे हे या लोकशाही परंपरेला आणि इमारतीच्या पवित्रतेला काळीमा फासणारे आहे.

महाराष्ट्राच्या लोकशाहीचे मंदीर असलेल्या सार्वभौम विधानमंडळाच्या इमारतीचे पावित्र्य अनादिकाळापर्यंत राखण्यासाठी, भविष्यात अशा पध्दतीने कोणत्याही सदस्यांनी किंवा परिसरात वावरणाऱ्या व्यक्तिंनी अंगविक्षेप, टिंगल टवाळी व तोंडाने विक्षिप्त आवाज काढून नकला करणे अशा कृत्यास आळा घालण्यासाठी व असे प्रकार करणाऱ्यांविरुध्द विधानसभा कठोर कारवाई करण्याकरीत आपण महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषद नियमात तरदूत करुन त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT