Mla Sunil Shinde Uddhav Thackeray  sarkarnama
मुंबई

Mla Sunil Shinde : उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा अखेर कडवट शिवसैनिक आमदार कडाडला, 'बिनबुडाच्या...'

Mla Sunil Shinde Uddhav Thackeray : सचिन अहिर यांच्यानंतर आमदार सुनील शिंदे हे देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Roshan More

Shivsena News : सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. एकनाथ शिंदेंसोबत ते गेले आहेत. त्यांच्यानंतर वरळीतील विधान परिषदेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे हे देखील जाणार असल्याची चर्चा सुरू होत्या. माध्यमांमधून ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. सुनील शिंदे हे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जाण्याच्या चर्चांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला वरळीत मोठा धक्का बसेल असे सांगितले जात होते. मात्र,याबाबत सुनील शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आपण ठाकरेंसोबत असल्याचे स्पष्ट करताना सुनील शिंदे म्हणाले आहेत की, 'माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या या अफवांमध्ये आणि बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी कालही शिवसेनेसोबत होतो, आजही शिवसेनेसोबतच ठाम उभा आहे आणि उद्याही राहणार आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने व मा. पक्षप्रमुखांच्या आदेशाने आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर मुंबईकर व वरळीकरांच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत राहणार आहे.'

सचिन अहिर यांचे नाव न घेत त्यांनी टिका करत म्हटले आहे की, 'या सर्व घडामोडींमुळे आत्मविश्वास गमावलेल्या आणि पायाखालची वाळू सरकलेल्या काही लोकांकडून माझी राजकीय बदनामी करण्याचा तसेच शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून माझ्याबाबत जाणीवपूर्वक खोट्या आणि बिनबुडाच्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या जात आहेत.'

'या सर्वामागील सूत्रधार कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला आणि शिवसैनिकांना ठाऊक आहे. माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या या अफवांमध्ये आणि बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.', असे देखील त्यांनी सांगितले आहे.

शिंदेंनी केला होता अहिरांचा पराभव

सुनील शिंदे हे 2014 ला वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार होते. तर, सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. या निवडणुकीत अहिर यांनी तब्बल 23 हजार मतांच्या मताधिक्याने अहिर यांचा पराभव केला होता. पुढे 2019 ला हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी सोडला. त्यावेळी अहिर यांचा देखील शिवसेनेत प्रवेश घडवून आणण्यात आला होता. शिवसेनेकडून अहिर आणि सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT