Sunil Tatkare On Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय ? छगन भुजबळ हे तटकरेंना जुमानत नाहीत ?

सरकारनामा ब्यूरो

Sunil Tatkare News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील राजकीय वातावरण आपल्या बाजूने फिरविण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात काढलेल्या जन सन्मान रॅलीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांवर प्रत्यक्षपणे जोरदार हल्ला केला.

मूळ राष्ट्रवादीत बंड केल्यापासून भुजबळ हे पवारसाहेबांवर तुटून पडत राहिले. बारामती राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही भुजबळांनी आपला रोख पवारसाहेबांकडेच ठेवला. त्यानंतरच्या काही तासांत भुजबळ पवारसाहेबांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओकवर गेले. भुजबळ एकाकी पवारसाहेबांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळ पुरते हादरले.

बंडापासून पवारसाहेब आणि अजितदादांच्या पक्षात विस्तव जात नसतानाही भुजबळ पवारसाहेबांना भेटणार असल्याने खासदार सुप्रिया सुळेंना आश्‍चर्य वाटले. ‘या भेटीची कल्पना नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितले. त्यामुळे भुजबळ कशासाठी पवारसाहेबांना भेटले असावे, याकडे संशयाने पाहिले गेले.

भेटीनंतर थेट मीडियापुढे येऊन भुजबळ भेट कशासाठी इथपासून चर्चेचा तपशीलही सांगून टाकला. मात्र, या भेटीची कल्पना पक्षाचे प्रफुल्ल पटेलांना दिली होती, असे भुजबळांनी सांगितले. परंतु, प्रदेशाध्यक्ष म्हणून भुजबळांनी तटकरेंना Sunil Tatkare कल्पना देणे अपेक्षित होते.

तसे न केल्याने भुजबळ हे प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंना जुमानत नाहीत का, असा सवाल आता यानिमित्ताने पुढे येऊ शकतो. विशेष म्हणजे, भुजबळाने पक्षाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजितदादांना सांगायला होते, पण तेही न केल्याने भुजबळ राष्ट्रवादीत मनाला वाटेल ते वागतात, असे दिसून येत आहे.

दुसरीकडे, भुजबळ पवारसाहेबांकडे Sharad Pawar भेटीला जाणार आहेत, ते गेले आहेत, हे तटकरेंना माहीत नसावे हेही न पटणारे आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत काय काय घडत आहे, याची चर्चा तर होणार ना ?

तटकरे काय म्हणाले?

सुनील तटकरे म्हणाले, भेटीमागचे प्रयोजन छगन भुजबळ हेच सांगतील. भुजबळसाहेब नाराज नाहीत. कपोकल्पित काहाण्या पसरवू नये. त्यांनी बारामतीमध्ये जोरदार भाषण ठोकले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर भेट का घेतली हे समजेल.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT