Chhagan Bhujbal : आधी टीका नंतर भेट, पवारांशी चर्चेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Chhagan Bhujbal Meets Sharad Pawar : भेटीची वेळ न घेताच भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी गेले होते. अखेर दीड तासांच्या वेटिंगनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात चर्चा झाली.
Chhagan Bhujbal | Sharad Pawar
Chhagan Bhujbal | Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar-Chhagan Bhujbal Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी भेट घेतली. रविवारी बारामतीतून भुजबळांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यानंतर सोमवारी भुजबळांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं होतं.


सोमवारी छगन भुजबळ वेळ न घेताच शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले. तब्बल दीड तास 'वेटिंग' केल्यानंतर भुजबळ आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. यानंतर भुजबळांनी भेटीचं कारण सांगितलं आहे.

Chhagan Bhujbal | Sharad Pawar
Chhagan Bhujbal : मोठी बातमी! बारामतीत टीका केल्यानंतर भुजबळ आज 'सिल्व्हर ओक'वर; अर्ध्यातासापासून 'वेटिंग'वर

छगन भुजबळ म्हणाले, "मी शरद पवार यांची वेळ न घेताच 'सिल्व्हर ओक'वर गेलो होते. पण, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते झोपले होते. त्यामुळे मला दीड तास थांबावं लागलं. त्यानंतर तब्बल दीड तास आम्ही चर्चा केली. मी राजकारण करण्यासाठी, आमदार, मंत्री किंवा कुठली पक्षीय भूमिका घेऊन आलो नाही. महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही ( शरद पवार साहेब ) केलं. राज्यातील काही जिल्ह्यांत स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये आणि ओबीसी, धनगर, वंजारी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं शरद पवारांना सांगितलं."

"राज्यात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापाठीला देताना मराठवाडा पेटला होता. अशावेळी तो शांत करून सरकारचं काय होईल ते होईल, मात्र मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलं पाहिजे, अशी भूमिका तुम्ही (शरद पवार) मांडली होती. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तुम्ही दिलं, अशी आठवण शरद पवारांना करून दिली," असं भुजबळांनी म्हटलं.

Chhagan Bhujbal | Sharad Pawar
Supriya Sule : भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर, सुप्रिया ताईंचे डोळे विस्फारले

"आज मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं असताना तुम्ही ( शरद पवार साहेब ) सर्वपक्षीय बैठकीला आला नाही. त्यावर शरद पवारांनी म्हटलं, 'मुख्यमंत्री जरांगे-पाटलांना भेटले. त्यांच्यात काय चर्चा झाली आणि आश्वासन दिली, याची आम्हाला माहिती नाही. ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेल्यावर तुम्ही त्यांना काय म्हणाला? याची माहिती नाही.' मात्र, हाके आणि उपोषणकर्त्यांना चर्चा करून मार्ग काढण्यास आम्ही सांगितलं. परंतु, जरांगे-पाटलांना कुणी मंत्री भेटले, त्यांनी काय आश्वासनं दिली, हे मला माहिती नाही. याबाबत तुम्ही ( शरद पवार साहेब ) मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे सर्व समाज घटकांची माहिती तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री आणि मुख्यमंत्री झालो, तरी आम्हाला सगळा अभ्यास आहे, असं नाही. म्हणून तुम्ही ( शरद पवार साहेब ) पुढाकार घेतला पाहिजे, अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन-चार लोकांना घेऊन काय झालं? काय होतेय? काय केलं पाहिजे, यावर मी दोन दिवसांत चर्चा करण्यास तयार असल्याचं शरद पवारांनी मला सांगितलं," अशी माहिती छगन भुजबळांनी दिली.

Chhagan Bhujbal | Sharad Pawar
Sharad Pawar-Chhagan Bhujbal : शरद पवार-भुजबळ भेटीवर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया; ‘भुजबळांना तरी परवानगीची गरज नाही...’

मात्र, मराठा समाज आणि ओबीसींचा प्रश्न सुटावा यासाठी मी कुणालाही भेटण्यास तयार आहे. राहुल गांधी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मी भेटेल. राज्यातील वातावरण शांत राहावं, हा माझा हेतू आहे. यात कुठलेही राजकारण नाही," असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com