Sunil Tatkare: अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खाद्यावर आली. त्यानंतर आता संघटनेमध्ये अनेक महत्वाचे बदल होताना दिसत आहेत. त्यानुसार, नुकतेच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची त्यांनी नियुक्ती केली. तसंच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता सर्वात मोठा बदलाचे संकेतही सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार, राष्ट्वादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांचं पद जाण्याची शक्यता यातून वर्तवली जात आहे. पण नेमक्या या काय आणि कशासाठी घडामोडी घडत आहेत? जाणून घेऊयात.
जनसुराज पार्टीचे प्रमुख आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. बिहारमधील बाराबांकी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रशांत किशोर आमदार झाले आहेत. त्यामुळं त्यांनी पवार यांची सदिच्छा भेट घेतली असेल अशी चर्चा होती. पण ही केवळ सदिच्छा भेट नसल्याचं तर त्यात दीर्घ स्वरुपाची गंभीर राजकीय चर्चाही झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यानुसार, प्रशांत किशोर यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जनमाणसात काय प्रतिमा आहे किंवा चर्चा आहे त्याअनुषंगानं काही बदल सुचवल्याचं सुत्रांच्या माध्यमातून कळतं आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीमध्ये राज्य नेतृत्वात बदल करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. म्हणजेच सध्या सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रमुख आहेत. त्यामुळं प्रशांत किशोर यांच्या सुचनेनुसार तटकरे यांना आता या पदावरुन हटवण्यात यावं अशी थेटच शिफारस त्यांनी केल्याची चर्चा आहे. त्यामुळं लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी आमदार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. ही भेट तब्बल ६ तास चालली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यनेतृत्व बदल करण्याची शिफारस त्यांनी केली.
तसंच पक्ष बांधणीसह संघटनास्तरावर काही महत्वाच्या सूचनाही यावेळी प्रशांत किशोर यांनी केल्या आहेत.
प्रदेशाध्यक्षपदी संघटनात्मक कामात सक्रीय असलेली व्यक्ती असावी असंही त्यांनी पवारांना सुचवलं आहे.
संघटनात्मक नियुक्त्या आणि घटनात्मक कामावर भर देण्याचा सल्लाही पवार यांना किशोर यांनी दिला. प्रशांत किशोर यांची टीम राष्ट्रवादी काँग्रेससाठी राज्यभर सर्व्हे करणार आहे. हा सर्व्हे झाल्यानंतर त्याचा जेव्हा अहवाल प्राप्त होईल त्यानंतर पक्षामध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात. तसंच पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्याची गरजही यावेळी किशोर यांनी पवार यांना व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.