Eknath Shinde news:
Eknath Shinde news:  sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News: 'सुपरफास्ट CM'; गावीही शिंदेंचा कामाचा धडाका; तीन दिवसांत ६५ फाईल्सचा निपटारा...

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde Work On Holidays: ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी केलेला राज्यातील मुख्यमंत्री बदलाचा दावा; भाजपचे मंत्री व नेतेमंडळींकडून फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची वक्तव्यं, अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेलं पोस्टर यांसारख्या अनेक घडामोडींनी राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. याचवेळी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांमुळे एकनाथ शिंदे नाराज असून ते गावी गेल्याचं चर्चाही जोरदारपणे सुरु असतानाच मोठी अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील गावी सुट्टीवर गेल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी आपण गावी असतानाही कामच केले असल्याचे सिध्द केले दिले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नुकतंच एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे साताऱ्यात त्यांच्या गावी असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असल्याचे समोर आले आहे.

६५ फाईल्सचा विषय मार्गी...

मुख्यमंत्र्यांनी सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठका घेत विविध विभागांच्या ६५ फाईल्स विषय मार्गी लावला आणि त्या अनुषंगाने संबंधितांना सूचनाही दिल्याचे सांगण्यात आले आहे.

विरोधकांना टीकेऐवजी कामातून उत्तर देतो असं मुख्यमंत्री नेहमीच सांगत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी हे दाखवून दिलं आहे. रत्नागिरीत बारसू रिफायनरीवरुन आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री काम सोडून गावी निघून गेले, अशी टीका विरोधकांनी केली होती.याच टीकेला शिंदेंनी मिी सुट्टीवर नाही तर डबल ड्युटीवर असल्याचं सांगत प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये. मी सुट्टी घेतलेली नाही तर अनेकांना कायमचे सुट्टीवर पाठवलेले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे सोडून अचानक आपलं सातारा गाव गाठल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवरुन एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचंही बोललं जात होतं. तर मुख्यमंत्र्यांच्या अचानक सुट्टीवर शिंदे गटातील नेते व मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं. पण त्यात मतभिन्नता असल्याचंही पाहायला मिळालं होतं.

फडणवीसांचं ते चार ओळींचं टि्वट...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आपल्या दोन फोटोंसह हे ट्विट केलं आहे. मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग देऊन त्यांनी हे ट्विट केलं आहे. कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिग दिसत आहे. या फायलींवर फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. फडणवीस अत्यंत प्रसन्न मुद्रेत आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांचा चेहरा गंभीर दिसत आहे. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केल्याने अनेकतर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT