Kareena Kapoor & Amrita Arora

 

Sarkarnama

मुंबई

सुपरस्टार करीना कपूर आणि अमृता अरोरा ठरणार कोरोना सुपर स्प्रेडर

करीना (Kareena Kapoor ) आणि अमृता (Amrita Arora) यांच्या संपर्कात मोठ्या बॉलिवूड सुपरस्टार असल्याची माहिती मिळत आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : बॅालिवूडच्या (Bollywood) सुपरस्टार अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) यांना कोरोनाची (Covod-19) लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी कोरोना नियमाचे पालन न करता अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर बॅालिवूडच्या कलाकारांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कलाकारांची कोरोना आरटीपीसीआर (RTPCR Test) चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने देण्यात आले आहे.

करीना आणि अमृता यांनी गेल्या काही दिवसापासून अनेक पार्टीमध्ये उपस्थिती लावली होती. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्र्या सूपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्यातील जनतेला सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, दुसऱ्याबाजूला बॅालिवूडची सुपरस्टार मंडळी ही सातत्याने कोरोना नियमांना धाब्यावर बसवत पार्ट्यांमध्ये मग्न आहेत.

या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या संपर्कात आल्या, त्या सर्वांच्या आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरूवात केली आहे. आज (ता.13 डिसेंबर) आणखी काही बॉलिवूड अभीनेते आणि अभीनेत्रींचे कोरोना रिपोर्ट येणार आहेत. करीना आणि अमृता यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची बीएमसीने कोरोना चाचणी केली आहे. आता त्यांच्या रिपोर्ट्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये काही मोठ्या बॉलिवूड सुपरस्टारांची नावे असल्याची माहीती मिळत आहे.

दरम्यान, कोविड-19 संसर्ग होऊ नये यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तर, मुंबई महापालिका व आरोग्य विभाग पोटतिडकीने कोविड-19 संसर्गाला रोखण्यासाठी जीवाचा आटापीटा करत आहे. मात्र, दूसरीकडे जनतेच्या गळ्यातील ताईत असलेले सुपरस्टार सेलिब्रेटी हे कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत त्यांचे पार्टी लाईफ सुरू ठेवत आहेत. त्याचा परीणाम आता दिसू लागला आहे. आता या दोन अभिनेत्रीमुळे किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला यासाठी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आटापीटा केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT