भाजप नेते मोदींचे रूप डोळ्यात साठवत असताना राष्ट्रवादीचे नेते तेथे पोहोचले...

प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) हे याच वेळी बाबुलनाथ मंदिरात पोहोचणे हा योगायोगा?
BJP leaders at Babulanath
BJP leaders at BabulanathSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा काशी दौरा देशभरात (PM Modi visit Kashi Vishwanath Temple) गाजत आहे. मोदी यांच्या या मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन आज देशभर दाखविण्यात आले. त्यासाठी भाजपनेही कंबर कसली होती. देशभरात भाजप कार्यकर्ते मोदींचे हे रूप साठविण्यासाठी विविध मंदिरात जमले होते. मात्र त्याच वेळी अनाहूत राजकीय पाहुणा आल्याने त्याची राजकीय चर्चा झाली नाही तरच नवल.

मुंबईतील प्रसिद्ध बाबूलनाथ मंदिरात भाजपचे प्रमुख नेते नरेंद्र मोदींचे वाराणसीतील कार्यक्रम स्क्रिनवर पाहण्यासाठी एकत्र जमले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, मंगलप्रसाद लोढा, कृपाशंकरसिंह असे नेते या मंदिरात आले होते. त्याच वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

BJP leaders at Babulanath
मोठी बातमी : लॉकडाउनमध्येही पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघात दारू दुकाने राहणार खुली

प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते आणि मी एकत्र आल्याचा केवळ योगायोग आहे. मी फक्त देवदर्शनाला आलो आहे. मी सोमवारी मुंबईत असलो की बाबाच्या दर्शनासाठी येत असतो. काही राजकिय कारण नाही. काशी कॅारीडॅार होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. कोणतेही सरकार असो त्यांनी हे प्रयत्न केले पाहीजे, असे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

BJP leaders at Babulanath
पंतप्रधान मोदींसाठी आज लाखमोलाचा दिवस! स्वप्न आज होणार साकार

या कार्यक्रमानंतर बोलताना फडणवीस यांनी आपण आज राजकीय विषयावर बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र काशीतील विविध विकासकामांचे उदघाटन पाहून आज आम्ही खूप खूष आहोत. आमची प्राचीन मंदिरे आक्रमणकाऱ्यांनी नष्ट केली होती. मागच्या काळात अनेक ठिकाणी ही नष्ट केलेली मंदिरे शिवाजी महाराजांनी वाचवली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी तोडलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. ज्यावेळी पंतप्रधान काशीला गेले होते तेव्हा ते `मुझे किसिने भेजा ना मै आयां हूॅं. मुझे मां गंगा ने बुलाया, असे त्यांनी म्हटले होते. त्यांना गंगा मातेने का बोलवले, याचा आज प्रत्यय येतो. आमचे राष्ट्र, भारत देश आणि राज्यावरील अरिष्ट दूर कर असे मी भोलेनाथाकडे मागितले आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com