Pradeep Sharma Sarkarnama
मुंबई

Pradeep Sharma: जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

Lakhan Bhaiya Fake Encounter Case : लखनभैय्या हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाने कायम जामीन मंजुर केला आहे. दोन महिन्यांपूर्वी बनावट एन्काउंटरप्रकरणी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

Pradeep Sharma: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लखनभैय्या हत्या प्रकरणी शर्मा यांना मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) कायम जामीन मंजूर केला आहे. दोन महिन्यांपूर्वी बनावट एन्काउंटरप्रकरणी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना आता जामीन व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयच्या या निकालाविरोधात प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाद मागितली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर शर्मा यांना कायम जामीन मंजूर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई उच्च न्यायालयच्या या निकालाविरोधात प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांना कायम जामीन मंजूर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

शिवाय प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) सरेंडर होण्याची अट रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या डबल बेंचने दिले आहेत. तसंच सात दिवसात जामीन प्रक्रिया पुर्ण करा असे आदेशही मुंबई सत्र न्यायालयाला दिले आहेत. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना लखनभैय्या हत्या प्रकरणात सेशन कोर्टानं निर्दोश मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने निकाल फिरवून प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवलं होतं.

काय आहे प्रकरण?

लखनभैयाचे खरे नाव रामनारायण गुप्ता असून, त्याच्याविरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी लखनभैयाचा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा सात बंगला येथील नाना नानी उद्यानाजवळ पोलिसांच्या बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. या चकमकीचे नेतृत्व एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले होते.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT