Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo Sarkarnama
मुंबई

Shinde Vs Thackeray : शिवसेना अन॒ धनुष्यबाण ठाकरेंना मिळणार की शिंदेंकडे कायम राहणार; येत्या ३१ जुलै रोजी होणार सुनावणी

Supreme Court Hearing on Shivsena: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारनामा ब्यूरो

Shivsena News : शिवसेनेतील बंडानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले होते. त्याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी येत्या ३१ जुलै रोजी होणार आहे. त्याबाबतच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (Supreme Court hearing on 31st July on Thackeray group's petition against Election Commission)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री शिंदे गटाला (Eknath Shinde) देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाचा तो निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) वतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आता येत्या ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय कायम ठेवणार की त्यात बदल करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. आयोगाचा तो निर्णय रद्द करून ठाकरे गटाला दिलासा मिळतो की आयोगाचा निर्णय कायम राहतो, याचा फैसलाही या सुनावणीत होतो की आणखी पुढे ढकलला जातो, हेही पाहावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड केले होते. शिंदे यांच्यासह हे ४० आमदार सूरत, गुवाहाटी येथे गेले हेाते. त्यानंतर दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला होता. त्याबाबतचा निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धुनष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले होते. त्यावर ठाकरे गटाकडूनही निवडणूक आयोगला टार्गेट केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT