Eknath Shinde, Rahul Narwekar, Supriya Sule Sarkarnama
मुंबई

Supriya Sule News : मुख्यमंत्री शिंदे-राहुल नार्वेकरांची गुप्त बैठक संशय निर्माण करणारी? सुप्रिया सुळे बोलल्या...

Supriya Sule On CM Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या गुप्त बैठकवरून आता सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तंबी दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर यांची गुप्त बैठक झाली. यामुळे सुप्रिया सुळे यांनी या गुप्त बैठकीवरून प्रश्न उपस्थित केला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी गुप्तबैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीत आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण ही भेट विकासकामांसंदर्भात झाल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आलं. आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या बैठकीवरून सवाल उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात गुप्त बैठक झाली असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकार आणि विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. असं असताना गुप्त बैठक झाली तर ते संविधानाच्या विरोधात आहे', असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

योग्य वेळी निर्णय घेऊ- राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर हे आज चंद्रपुरात एका कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांना आमदार अपात्रतेप्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. 'मी देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. आणि महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होऊ दे, ही मी प्रार्थना करणार आहे. आमदार अपात्रतेचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. आणि योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ', असं नार्वेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT