Shiv Sena MLA Disqualification : विधान परिषदेतील तीन आमदारांना अपात्र करा; ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार

Uddhav Thackeray News : ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA Disqualification Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : विधानसभेतील आमदार अपात्रताप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना शिवसेना ठाकरे गट सोडून विधान परिषदेतील तीन आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या तीन आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. तीन आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी ठाकरे गटाने मोठे पाऊल उचलले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर हे प्रकरण हाती घेतले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधान परिषदेतील आमदार नीलम गोऱ्हे, मनीष कायंदे, विप्लव बाजोरिया यांना अपात्र ठरविण्याचाही मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली होती. मात्र, त्याकडे विधिमंडळाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

Shiv Sena MLA Disqualification
Drug Mafia Lalit Patil: ड्रग्ज तस्करी प्रकरण; ललित पाटीलच्या भावासह साथीदार बलकवडेचा ताबा मुंबई पोलीस घेणार ?

तीन आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवांना दोनदा पत्र दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

चंद्रपुरात आजपासून सुरू होणाऱ्या देवी महाकाली महोत्सवाच्या उद्घाटनाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चंद्रपुरात आले आहेत. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार अपात्रप्रकरणी बोलण्यास नकार दिला.

ठाकरे गटाने विधान परिषदेतील तीन आमदारांविरोधात याचिका दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पाच आमदारांविरोधात याचिका सादर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण,अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात याचिका सादर केल्या आहेत.

Shiv Sena MLA Disqualification
Lalit Patil Latest News : ललितच्या दोन मैत्रिणींना अटक; 'ससून'मधून पळून जाण्यास मदत केली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com