Supriya Sule, Chandrasekhar Bawankule
Supriya Sule, Chandrasekhar Bawankule Sarkarnama
मुंबई

हेच का भाजपचे संस्कार; बावनकुळेंच्या विधानावर सुप्रिया सुळे संतापल्या

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. त्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला, अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. या टिकेला सुळे यांनी उत्तर देत भाजपला चांगलेच सुनावले. हेच भाजपचे संस्कार आहेत का, असा तिखट सवाल त्यांनी बावनकुळे यांना केला.

तसेच बावनकुळे यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल विधान दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात आपण सगळे लढत आहोत. वडिलांच्या वयाच्या माणसाबद्दल अशा बोलण्यातूनच त्यांची संस्कृती दिसते. हेच भाजपचे संस्कार आहेत का? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

राजकारणात लहान मोठे कुणीही असो, काय बोलायचे याचे संस्कार मला आई-वडिलांनी दिले आहेत. मात्र, बावनकुळे जर अंधश्रद्धेबद्दल बोलत असतील तर विज्ञानाविषयी काय बोलणार? ही त्यांची विचार करण्याची छोटी पद्धत आहे, हे जिवंत उदाहरण आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, विरोधक रोज त्यांना शिव्या घालतात. मात्र, हेच काँग्रेसला दुषणं देत असतात. कालच बारामतीला आलेले केंद्रीय मंत्री इतके असेही काही बोलले की मला हसू आवरेना. हास्यास्पद विधान केले. त्यांना सांगायचे की तुमचेच मोदीजी आणि जेटली आमच्याकडे येऊन गेले, असा खोचक टोलाही त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना लगावला.

तसेच, 'भारत जोडो' यात्रा अतिशय चांगला उपक्रम आहे. सहभागी होऊन कृतज्ञता वाटली. देशभरातून राहुल गांधींना खूप प्रेम मिळत आहे. लोकांच्या फार अपेक्षा आहेत. मात्र, सगळे दडपशाहीने होत नसते. सत्ताधाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

या चवेळी सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी भाष्य करत विरोधकांना लक्ष्य केले. हर हर महादेव चित्रपटावरुन जितेंद्र आव्हाडांनी कुणालाही मारहान केली नाही. मात्र, राज्य सरकारने चित्रपटाविषयी भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे. आम्हाला यावर राजकारण करायचे नाही पण जो गलत है वो गलत है, छत्रपतींच्या विरोधातील सिनेमे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही खासदार सुप्रिया सुळेंनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT