Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत, शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, दिपील वळसे पाटील यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. अजित पवारांच्या बंडखोरीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
सुळे यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीवर एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नावर पवारांनी उत्तर दिले. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चे नाव घेतले. हा व्हिडीओ शेअर करत सुळेंनी 'प्रेरणास्थान' (Inspiration) असे एका शब्दात आपली भावना व्यक्त केली. सुळेंचे हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला होता. यावर पवारांनी स्वत:चा हात उंचावत आणि स्मितहास्य करत 'शरद पवार' असे उत्तर दिले. हाच व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) ट्विट केला आहे. त्यावर 'प्रेरणास्थान' असे कॅप्शन एका शब्दा दिले आहे.
अजित पवारांच्या बंडखोरीवर भाष्य करताना पवार म्हणाले की, अजित पवारांबरोबर गेलेल्या काही सहकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. आमची वेगळी भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. आम्हाला याठिकाणी निमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्या. मात्र, आमची भूमिका वेगळी आहे. आमची भूमिका कायम आहे, याचा खुलासा अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांनी केला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.