Ajit Pawar-Anjali Damania News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली दमानियांनी केलेल्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ''अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचे ट्वीट मी वाचलेले नाही. मात्र, त्यांनी काही लिहिले असेल, तर त्यांना तो अधिकार आहे''.
पावसाच्या उदाहरणासह सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले. ''१५ मिनिटांनी इथे पाऊस पडेल का? याचे उत्तर माझ्याकडे नाही. आत्ता उन आहे हे मी सांगू शकते. मात्र, १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचे उत्तर माझ्याकडे नाही'' असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
दरम्यान, अजित पवार यांनी अंजली दमानियांच्या ट्वीट प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, ''एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे'' असा टोला लगावत त्यांनी दमानियांच्या वक्तव्यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात ईडीने क्लीनचिट दिल्याच्या वृत्तावर पवार म्हणाले, ''मला आणि सुनेत्रा पवार यांना कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत तथ्य नाही. ती चौकशी सध्या सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळाली नाही. ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला समजले नाही. मात्र, मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट अद्याप मिळालेली नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच... महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.'' असा दावा दमानिया यांनी केला, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.