Kapil Patil, Suresh Mhatre
Kapil Patil, Suresh Mhatre Sarkarnama
मुंबई

Video Suresh Mhatre Vs Kapil Patil : बाळ्या मामांनी कपिल पाटलांना घेतलं शिंगावर; म्हणाले, मी वाटच बघतोय...

Akshay Sabale

Maharashtra Politics : माजी खासदार कपिल पाटील यांनी मला नोटीस पाठवावी. मी वाटच बघतोय. त्यांच्या विरोधात मी दहा नोटिसा पाठविणार आहे, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी दिलं आहे.

तेलंगणातील भाजपचे आमदार टी. राजा ( T Raja ) यांच्या कार्यक्रमावरून कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे आमने-सामने आले आहेत. कपिल पाटील यांनी गेल्या दहा वर्षात असा कार्यक्रम का घेतला नाही? असा सवाल सुरेश म्हात्रेंनी उपस्थित केला आहे.

सुरेश म्हात्रे ( Suresh Mhatre ) म्हणाले, "कपिल पाटील यांनी गेल्या दहा वर्षात असा कार्यक्रम का घेतला नाही? बकरी ईदला दोन दिवस असताना टी. राजा यांचा कार्यक्रम घेण्यात आला. माजी खासदारांनी माझ्या बुद्धीची कीव करण्यापेक्षा त्यांची बुद्धी तपासून घ्यावी."

प्रकरण काय?

माजी खासदार कपिल पाटील ( Kapil Patil ) यांच्या फाउंडेशनच्या वतीनं तेलंगणाचे आमदार टी. राजा यांच्या उपस्थितीत संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास सुरेश म्हात्रेंनी विरोध केला होता. "टी. राजा यांच्या वक्तव्यामुळे भिवंडी शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमास त्यांनी परवानगी देऊ नये," अशी मागणी सुरेश म्हात्रेंनी केली होती.

"टी. राजा सिंह यांच्यावर 105 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर, 18 ते 20 गुन्हे जातीय तेढ निर्माण करणारे आहेत. भिवंडी मुस्लिम बहुल शहर आहे. अशा ठिकाणी जर जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य होत असेल, तर वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाल हिंदू समाजाच्या सभेला विरोधी नसून टी. राजा यांना विरोध आहे," सुरेश म्हात्रेंनी सांगितलं होतं.

यानंतर कपिल पाटील यांनी सुरेश म्हात्रेंविरोधात दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. पण, आता सुरेश म्हात्रेंनी नोटिस पाठवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे कपिल पाटील काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT