Kapil Patil, Suresh Mhatre
Kapil Patil, Suresh Mhatre Sarkarnama
मुंबई

Suresh Mhatre : कपिल पाटलांचा भिवंडीत दंगल घडवण्याचा डाव; बाळ्या मामांचा खळबळजनक आरोप

Sunil Balasaheb Dhumal

भिवंडीतून खासदार झालेल्या सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामांनी Suresh Mhatre कामाला सुरुवात केलेली आहे. त्यातच आता भिवंडीत येणाऱ्या तेलंगणातील भाजप आमदार टी राजा यांना कडाडून विरोध केला आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार कपिल पाटील मदत करत आहे. या माध्यमातून त्यांचा भिवंडीत धार्मिक तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा हेतू असल्याचा खळबळजनक आरोप खासदार म्हात्रेंनी केला आहे.

भिंवडी तालुक्यातील पडघा टोलनाका परिसरात सकळ हिंदू समाजाच्या वतीने सभा शनिवारी होणार आहे. त्यासाठी तेलंगाना येथील वादग्रस्त भाजप आमदार टी. राजा सिंग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्या उपस्थितीला खासदार म्हात्रे यांनी जोरदार विरोध केला आहे.

या कार्यक्रमास विरोध नसून या कार्यक्रमासाठी येणारे टी. राजा सिंग यांना विरोध दर्शवला आहे. टी. राजा सिंग यांच्या वक्तव्यामुळे भिवंडी शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमास त्यांना परवानगी देऊ नये, असा आग्रह बाळ्या मामांनी शुक्रवारी पोलीस यंत्रणेकडे धरला.

या कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील Kapil Patil यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा कार्यक्रम कपिल पाटील यांच्या छुप्या अजेंड्याने आयोजित केला आगहे. पाटील स्वतः या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, परंतु मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरच या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले, असा थेट सवाल बाळ्या मामा यांनी उपस्थित केला. शहरात जातीय तेढ आणि भिवंडीत दंगली घडवण्याचा कट कपिल पाटील करत असल्याचा आरोप बाळ्या मामा यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तेलंगना येथील आमदार टी राजा सिंग यांच्यावर 105 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर 18 ते 20 गुन्हे जातीय तेढ निर्माण करणारे आहे. भिवंडी मुस्लिम बहुल शहर आहे. अशा ठिकाणी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य होत असेल तर वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या सभेला विरोध नसून या सभेमध्ये वक्तव्य करणारे टी. राजा सिंग यांना विरोध असल्याचे बाळ्या मामा यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर अनेक स्टेटस देखील फिरवले जात आहे ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो त्यामुळे सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण पोलिस प्रशासनाकडे केली असल्याचेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT