Vijay Wadettiwar : हप्ता वसुली करणारे मंत्र्यांचे नातेवाईक कोण? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाने खळबळ

Vijay Wadettiwar hingna midc blast : वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतल स्फोटाला थेट राज्य सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले, स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांची दर तीन महिन्यांनी पाहणी करणे बंधनकारक आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Vijay Wadettiwar News : हिंगणा एमआयडीतीसील स्फोटानंतर आता राजकीय भडका उडतोआहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह डझनभर नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

स्फोटातील मृतकांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत करण्याची मागणी केली जात आहे. यात विजय वडेट्टीवार यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे नातेवाईक दर तीन महिन्यांनी नागपूरला येतात आणि स्फोटक तयार करणाऱ्या कंपन्यांकडून वसुली करतात, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

नागपूर-अमरावती मार्गावरच्या धामना गावात चामुंडी एक्स्फोसिसव्ह कंपनी आहे. येथए फटाक्यांची निर्मिती केली जाते. गुरुवारी (ता.13) दुपारी या कंपनीत मोठा स्फोट झाला. यात होरपळून पाच महिलांनाच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत. स्फोट झाल्याचे समजताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत समारंभ तसेच सत्काराचे सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यांनी आज (शुक्रवारी) सकाळीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Vijay Wadettiwar
Rohit Pawar On Anna Hazare and BJP : रोहित पवारांनी मीठ चोळलं? 'क्लोजर रिपोर्ट, कथित गांधींना जाग अन् भाजपची 'युज अँड थ्रो' प्रवृत्ती'

वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी आक्रमक भूमिका घेतल स्फोटाला थेट राज्य सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले, स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांची दर तीन महिन्यांनी पाहणी करणे बंधनकारक आहे. यापूर्वीसुद्धा याच परिसरातील एका कंपनीत भीषण स्फोट झाला होता. मात्र मदत जाहीर करून सरकार आपली सुटका करून घेते. स्फोट होऊ नये आणि सुरक्षे संदर्भात काहीच उपाय योजना केल्या जात नाही. खबरदारी घेतली जात नाही.

हे वारंवार आढळून आले आले आहे. अशा धोकादायक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र केवळ कागदी घोडे नाचवले जातात. कागदोपत्री खानापूर्ती करून कंपन्यांना प्रमाणपत्र दिले जाते. कोणाचेही नाव न घेता यावेळी वडेट्टीवार यांनी यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या खात्याचे मंत्री असलेल्यांचे नातेवाईक मात्र नियमितपणे कंपन्यांना भेट देतात आणि हप्ता वसुली करतात असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

(Edited By Roshan More)

Vijay Wadettiwar
Rahul Kalate : 'हम भी है रेस में!'; अश्विनीवहिनी अन् शंकरशेठ यांना राहुल कलाटे देणार चॅलेंज...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com