Sushil Kumar Shinde, Amit Deshmukh
Sushil Kumar Shinde, Amit Deshmukh sarkarnama
मुंबई

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा महत्त्वपूर्ण ठराव; शिंदे, देशमुख अन् थोपटेंची दांडी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेसची (Congress) मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde), अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि आमदार संग्राम थोपटे अनुपस्थित होते, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री श्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थितीत होते.

प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव, नाना पटोले यांनी मांडला. या ठरावाला बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले. सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला.

तसचे बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदी खासदार राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. हा ठराव सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला. मात्र, बैठकीनंतर नेत्यांच्या अनुपस्थितीचीच चर्चा अधिक रंगली.

बैठकीनंतर नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत नाना पटोले यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, अमित देशमुख परदेशात आहेत. संग्राम थोपटे यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आले नाहीत. तर सुशील कुमार शिंदे यांनी बैठकली न येण्या संदर्भात कळवले होते, असे पटोले यांनी सांगितले. मात्र, काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक असतानाही, नेत्यांनी हजेरी लावली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT