शरद पवारांनी दिल्या नाना पटोलेंना शुभेच्छा !

Congress President : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
Nana Patole, Sharad Pawar
Nana Patole, Sharad Pawar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

पुणे : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी येत्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यावर आज पंढरपूर येथे बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वबळावर लढणार असतील तर त्यांना शुभेच्छा असे म्हणत दोनच शब्दात पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

Nana Patole, Sharad Pawar
एक दिवस पुन्हा काँग्रेसचाच येणार : बाळासाहेब थोरातांना विश्वास

आगामी काळातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा सुरू असतानाच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळी भूमिका मांडायला सुरवात केली आहे. या पुढच्या निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढेल, असे पटोले यांनीच दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर पवार यांनी उत्तर दिले.

Nana Patole, Sharad Pawar
आदिवासी विकासमंत्री गावितांना नंदुरबारमध्ये धक्का; पुतणीचा शिवसेनेकडून पराभव

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेवर होते. कॉंग्रेस या सत्तेत सहभागी झाली तरी या पक्षाची भूमिका फार महत्वाची राहिली नव्हती. तेव्हापासूनच पटोले यांच्याकडून सातत्याने वेगळी भूमिका मांडण्यात येत आहे. अडीच महिन्यांपूर्वी आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर पटोले यांच्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेला आणखी धार आली आहे.

राहूल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेमुळे देशातील वातावरण बदलत आहे. या यात्रेचा कॉंगेस पक्षाला नक्की फायदा होईल, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. मी स्वत:देखील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळगाव ते नागपूर अशी यात्रा काढल्याची आठवण पवार यांनी यावेळी सांगितले.

देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकत्रित आघाडी करण्याची भूमिका मांडण्यात येत आहे. ही भूमिका देशातील विविध पक्षांना मान्य आहे. मात्र, अद्याप त्यावर अंतीम निर्णय झालेला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com