Thackeray-Shinde Politics: गेल्या आठवड्यात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणामुळे आता शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुषमा अंधारे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी अंधारे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शिरसाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी महिला आयोगातही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज अंधारे यांनी शिरसाट यांच्यावर 'तीन रुपयांचा' अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेतत शिरसाट यांनी अंधारे यांच्यावर अंत्यत खालच्या भाषेत टिका केली होती. हे प्रकरण अंगलट येईल असे लक्षात येताच त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देत सारवासारव केली. शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आपण त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलो होतो पण आपली तक्रार दाखल करुन घेतली गेली नाही. असा आरोपही अंधारे यांनी केला होता.
याप्रकरणी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. ''उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पोलीस ठाण्यात न जाता त्यांची तक्रार नोंदवली जाते. आमदार गणेश बिडकर यांचे व्हिडिओ व्हायरल होताच खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो. मात्र आमची तक्रार दाखल होत नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
मी महिला आयोगात तक्रार दाखल केली. पण महिला आयोगाच्या अहवालाची दखल घेतली नाही. असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचेही आभार मानले आहेत. सुप्रिया सुळे यांचे मी आभार मानते, विविध क्षेत्रातील महिलांनी भूमिका मांडली त्यांचे मी आभार मानते, असं त्यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलतानाही शिरसाटांनी अहंकारी भाषा वापरली. पण आज मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची प्रक्रिया सुरुवात करत आहे. आधी संबंधित व्यक्तींना नोटीस देत आहोत. कोर्टात ही तक्रार दाखल करणार आहे. आम्ही मध्यमवर्गी आहोत आम्हाला अब्रू जपायची असते आम्हाला कुठल्या ही आर्थिक फायद्यासाठी हे करायचे नाही, यासाठी मी त्यांच्यावर फक्त तीन रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.
तसेच, कुठल्या ही पोलिस ठाण्यात माझी तक्रार नोंदवली नाही. मंत्री अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलेल्या गोष्टीवर चाप बसण्याची गरज आहे. ते काय माफी मागणार आहेत? अशी टिकाही सुषमा अंधारे यांनी केली. तसेच, लोकप्रतिनिधींडून अशी विधानं होणं आणि यावर काहीच कारवाई नाही झाली तर तळागाळातील महिलांना कशी मदत होईल, असा प्रश्नही अंधारेंनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.