Sushma Andahare
Sushma Andahare Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare: ऐनवेळी तब्येत खालावली तरी खासदार शिंदेच्या मतदारसंघात सुषमा अंधारेंची तोफ धडाडली...

सरकारनामा ब्यूरो

Sushma Andhare Latest News : ठाकरे गटाचे नेत्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून राज्यभरात सुरु असलेल्या महाप्रबोधन यात्रेद्वारे शिंदे गट आणि भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये गुरुवारी त्यांची सभा होणार होती. त्यांच्या सभेची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी देखील सुरु होती. मात्र, याचवेळी त्यांची तब्येत खालावली आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. पण तब्येत खालावल्यानंतरही अंधारे ह्या सभा घेण्यावर ठाम होत्या. आणि ठरल्याप्रमाणे सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची तोफ खासदार शिंदेंच्या मतदारसंघात धडाडली.

मुख्यमंत्र्याचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याच्या मतदारसंघात ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्या सुषमा अंधारे व शरद कोळी यांची महाप्रबोधन यात्रा जाहीर सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले बंडखोर आमदार विश्वनाथ भोईर हेही कल्याण पश्चिम मतदार संघातील असल्याने सुषमा अंधारे आणि शरद कोळी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. /या सभेआधीच सुषमा अंधारे यांची तब्येत खालावली. मात्र, तरीदेखील त्यांनी नियोजित सभा घेतली.

सुषमा अंधारे यांनी या सभेत सीमावादासह अनेक मुद्द्यांवरुन केंद्र सरकार,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अंधारे म्हणाल्या, गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राला एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. भले ते कसेही कुट कारस्थान करून का होईना. परंतु महाराष्ट्रातले उद्योग जर गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यातही मी ही आठवण करून दिली पाहिजे की क्रिकेटर जडेजा यांनी ट्विटरवर जो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर केला होता. तो या गोष्टीचा द्योतक आहे की आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचा व्हिडिओ वापरावा लागतो. त्यांच नाव वापरावा लागतं यातच आमचा विजय आहे, आणि यातच भाजपाची हार सुद्धा आहे.

बावनकुळे यांनी असं नाही म्हटलं तर त्यांचं प्रदेशाध्यक्षपद जाऊ सुद्धा शकते. यावरून हे सिद्ध होते की, भाजपकडून सध्या सुडाचं राजकारण सुरु आहे. तुम्ही काहीही बोललात की, आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतात जशा कल्याणमध्ये अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. या पद्धतीचं राजकारण ते करू शकतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा आम्हांला फार काही वाटत नाही.त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहोत.

महाप्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आहे अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. यावर अंधारे म्हणाल्या, काय कमाल आहे महाप्रबोधन यात्रा ही आम्ही सुरू केलेली, आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. शिंदे गटाची अडचण अशी आहे की, त्यांनी प्रचंड पैसा पेरला, प्रचंड माणसं फोडली. पण एवढी सगळी माणसं फोडूनसुद्धा अजेंडावर काम करायला माणूस नाही. म्हणजे सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा अशी गत त्यांची झाली आहे अशा शब्दांत अंधारे यांनी हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT