Neelam Gorhe Vs Sushma Andhare Sarkarnama
मुंबई

Neelam Gorhe Vs Sushma Andhare : मी माफी मागणार नाही, अंधारेंचे संस्कृतमध्ये पत्र; होणार हक्कभंगाची कारवाई?

Sushma Andhare Letter To Neelam Gorhe : सुषमा अंधारेंवर हक्कभंगाची कारवाई होणार? उपसभापती नीलम गोऱ्हे काय घेणार निर्णय?

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्याची चिन्हे आहेत. सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केला होता. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली होती. मात्र, सुषमा अंधारे यांनी आठ दिवसांत पत्र लिहून माफी मागावी, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले होते. आता सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

हक्कभंगाच्या मुद्द्यावर सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले आहे. मी माफी मागणार नाही. त्यासाठी मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी हे पत्र संस्कृत भाषेत लिहिले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपल्यावर जे आरोप होत आहेत त्या पार्श्वभूमीवर संस्कृतमध्ये पत्र लिहिल्याचे अंधारे यांनी नमूद केले आहे.

हे पत्र विधानपरिषदेच्या सभापतींना उद्देशून लिहिले असले तरी पत्राचा जो आशय आहे तो प्रिय लोकशाही अशा अर्थाने आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपण लढायला तयार आहोत, अशा आशयाचे हे पत्र आहे. या पत्राच्या शेवटी सुषमा अंधारे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यावर हक्कभंगाची कारवाई झाली तरी आपण माफी मागणार नाही. त्यासाठी तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल. यासाठी आपली तयारी आहे, असे अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांच्या विचारधारा सुषमा अंधारे मांडत आल्या आहेत, त्या महापुरुषांचा त्यांनी पत्रात ठिकठिकाणी उल्लेख केला आहे.

अंधारेंवर काय कारवाई होणार?

सुषमा अंधारे यांनी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त करावी, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले होते. आता सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने यावर नीलम गोऱ्हे निर्णय घेतील. हक्कभंग दाखल करून घ्यायचा की नाही? हे त्या ठरवतील. आणि पुढे त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय उपसभापती नीलम गोऱ्हे यांना घ्यायचा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे नेमकं प्रकरण?

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना सभागृहात बोलू दिले जात नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. धंगेकर हे विधानपरिषदेचे सदस्य नसताना त्यांना बोलू देण्याचा प्रश्नच येत नाही. अंधारेंचे आरोप चुकीचे आहेत. त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी मांडला होता. नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण गाजले.

Edited by Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT