Neelam Gorhe Vs Sushma Andhare : आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त करा, अन्यथा... ; उपसभापती गोऱ्हेंचा अंधारेंना इशारा...

Neelam Gorhe Vs Sushma Andhare : 'रवींद्र धंगेकर यांना नीलम गोऱ्हे यांनी मला बोलू दिले नाही...'
Neelam Gorhe Vs Sushma Andhare
Neelam Gorhe Vs Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly session 2023 : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविषयी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आज वरिष्ठ सभागृहात उमटले. यावेळी सभापती म्हणाले की, सत्यता पडताळून निराकरण न करता विधाने करणे योग्य नाही. त्यामुळे अंधारे यांनी आठ दिवसांत लिखित दिलगिरी व्यक्त न केल्यास, त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची सूचना केली जाईल, असा इशारा उपसभापती गोऱ्हे यांनी दिला. यामुळे आता ठाकरे गटाच्या रणरागिणी नेत्या अशी ओळख असणाऱ्या सुषमा अंधारे माफीनामा देणार की हक्कभंगाच्या कारवाईला सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Neelam Gorhe Vs Sushma Andhare
Solapur NCP News : अजितदादांच्या सोलापुरातील सहा शिलेदारांना सत्तेची 'पाॅवर'

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना नीलम गोऱ्हे यांनी मला बोलू दिले नाही, असा आरोप विरोधक करत आहेत, हा मुद्दा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडला. धंगेकर यांचा विधानपरिषदेशी काहीही संबंध नाही, तरीही त्यांनी माहिती न घेता तसे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची परवानगी मला द्यावी, अशी विनंती केली होती.

यावर सभापती गोऱ्हेंनी याबाबतचा एक व्हिडिओ माझ्याकडे देखील आला आहे, आमदार धंगेकर नव्हे तर शिवसेनेच्या एका प्रवक्त्यांनी तसे विधान केले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्यांच्या या विधानावर सभागृहातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापती गोऱ्हे यांनी धंगेकरांना बोलू द्यायला पाहिजे होते, असे भाष्य केले. या सर्व मुद्द्यांवर आता दरेकर यांनी आक्षेप नोंदवत अंधारे या देखील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्यांनी असे विधान केले असेल तर त्यांच्या विरोधात हक्कभंग आणला पाहिजे, असे सांगितले.

Neelam Gorhe Vs Sushma Andhare
BJP Vs Shivsena : अंधारे आणि फरांदेत जुंपली, फरांदे दाखल करणार हक्कभंग!

याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय गंभीर आहे. एकच खोटी गोष्ट तीन-तीन वेळा सांगितली की, ती खरी वाटायला लागते. जोसेफ गोबेल्स तंत्र हेच आहे. सभापतींविषयी विधाने होत असतील तर ते योग्य नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात डान्सबार बंदीचा निर्णय घेतल्यावर डान्सबार संघाचे अध्यक्ष मनजीतसिंग यांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. मी त्यांच्या पक्षाचा नव्हतो, तरीही मी त्याबाबत आक्षेप घेऊन हक्कभंग आणला होता. त्यांना 90 दिवसांची शिक्षा झाली होती. ते पुढे म्हणाले, 'आज सोशल मीडिया अतिशय विस्तारला आहे. प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. अशा स्थितीत त्यावर गंभीर विचार झाला पाहिजे. त्यामुळे याबाबत निश्चित एक समिती तयार करून आचारसंहिता करावी, अशी सूचना केली.

याबाबत आमदार सचिन अहिर यांनी मी कोणत्याही वक्तव्याचे समर्थन करणार नाही. मात्र कुठे थांबावे, हे निश्चित केले पाहिजे. ते विधान स्लीप ऑफ टंग आहे. एकंदरच कामकाज तसेच सभागृहाच्या प्रतिष्ठेसाठी आचारसंहिता ठरविण्यासाठी एक समिती नेमावी. त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार शशिकांत शिंदे यांनी यावर हरकत घेत हक्कभंग आणण्याची पध्दत आहे. एक सदस्य तोंडी सांगेल तो हक्कभंग टाकता येत नाही. काल लोकसभ आणि राज्यसभेतून एकूण 141 सदस्यांना निलंबित केले. सभागृहाबाहेर अशी वक्तव्ये केली जातात. त्यामुळे याबाबत यासंदर्भात कायमस्वरूपी नियमावली करावी. मुख्यमंत्र्यांना मान आहे, तसाच विरोधी पक्षालाही आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com