Devendra Fadnavis, Sushma Andhare Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Fadnavis : 'फडतूस - काडतूस' वरुन अंधारे फडणवीसांना असं का म्हणाल्या, "..तुमच्या घरात एक बाई .."

सरकारनामा ब्यूरो

Sushma Andhare Tweet: शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. यावरुन शिवसेना-ठाकरे गटातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यात जुंपली आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण प्रकरणावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जोरदार समाचार घेतला.

"राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय", अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती. या टीकेला फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मी फडतूस नाही, काडतूस.. झुकेगा नहीं,” असे फडणवीसांकडून विधान करण्यात आलेले आहे.

पण त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधत तुम्ही झुकलेलेच आहात, असे म्हटलं आहे. ठाकरेंनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टि्वट करीत फडणवीसांना डिवचलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये सुषमा अंधारे म्हणतात, "झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नी वर स्पायिंग करत होती हे तुम्हाला 7वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव !!"

"आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आता मुख्यमंत्री कोणाच्या बाजुला बसलेले आहेत. ज्या मुख्यमंत्र्याला दोन शब्द नीट वाचता येत नाही, बोलता येत नाही. त्यांच्या नेतृत्वात तुम्ही अभिमानाने काम करताय, असे सांगत आहात. पण हे झुकणे नाही तर काय आहे. हे काय ताठ उभे राहणे आहे का?" असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जतना पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. भाजप नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान, भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी वापरलेला 'फडतूस' हाशब्द अतिशय सौम्य आहे. त्याउलट देवेंद्र फडणवीस हे भिजलेलं काडतूस आहे. त्यांनी उगाच आव आणू नये. राज्याच्या मंत्रिमंडळातील सगळेच मिस्ट झुके आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT